World Cup 2023: शुभमन गिल दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? BCCI कडूनच मिळाले महत्त्वाचे अपडेट्स

Shubman Gill: शुभमन गिलला डेंग्यु झाला असल्याचे समोर आले होते, त्यामुळे आता तो वर्ल्डकप 2023 मधील भारताच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे.
Shubman Gill
Shubman GillBCCI
Published on
Updated on

BCCI provides update on Shubman Gill's availability in India vs Afghanistan match of ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण या स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. कारण भारताचा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला युवा सलामीवीर शुभमन गिल याला स्पर्धेला सुरुवात होण्याआधी डेंग्यु झाल्याचे आढळले.

त्यामुळे तो रविवारी (8 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईला झालेल्या भारताच्या पहिल्या सामन्यातही खेळला नव्हता. त्याच्याऐवजी इशान किशनला कर्णधार रोहित शर्माबरोबर सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली.

दरम्यान आता बुधवारी (11 ऑक्टोबर) भारताला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध दिल्ली येथे खेळायचा आहे. मात्र, तो या सामन्यातही खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Shubman Gill
IND vs AUS मॅचनंतर ड्रेसिंग रुममध्ये मेडल जिंकताच विराट भलताच खूश, BCCI ने शेअर केला BTS व्हिडिओ

बीसीसीआयने सोमवारी (9 ऑक्टोबर) माहिती दिली आहे की शुभमन गिल भारतीय संघासह 9 ऑक्टोबर 2023 रोजी चेन्नईहून दिल्लीला गेलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पहिल्या वर्ल्डकप सामन्याला मुकल्यानंतर आता तो अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळणार नाही. तो पुढील काही दिवस चेन्नईमध्येच राहणार असून त्याच्यावर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असेल.

गिल यावर्षी दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याच्याकडून वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. मात्र, त्याला पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळताच आलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे हा गिलचा कारकिर्दीतील पहिलाच वनडे वर्ल्डकप आहे.

Shubman Gill
Shubman Gill Record: शुभमन गिलने मोडला गांगुली-धोनीचा 'हा' खास रेकॉर्ड, वनडे बादशाहत...!

गिलने 2023 यावर्षी आत्तापर्यंत 20 वनडे सामन्यांमध्ये खेळताना 72.35 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत. सध्या यावर्षी वनडेत 1000 धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने यावर्षी 5 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.

दरम्यान, गिल 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या वर्ल्डकपच्या सामन्यात खेळण्याची आशा क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे. मात्र, तो कधी भारताकडून पुनरागमन करू शकतो, याबद्दल बीसीसीआयने माहिती दिलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com