IND vs AUS मॅचनंतर ड्रेसिंग रुममध्ये मेडल जिंकताच विराट भलताच खूश, BCCI ने शेअर केला BTS व्हिडिओ

Virat Kohli Video: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप 2023 मधील पहिला सामना जिंकताच विराटला ड्रेसिंग रुममध्ये एक खास मेडलही देण्यात आले, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
Virat Kohali | India vs Australia
Virat Kohali | India vs AustraliaBCCI

Cricket World Cup 2023, India vs Australia, Virat Kohli Won Best Fielder Medal:

रविवारी भारतीय क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धच्या आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना पार पडला.

दरम्यान, भारताच्या या विजयात विराट कोहलीने क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी असे दोन्ही क्षेत्रात योगदान देत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याच्या या योगदानाची दखल ड्रेसिंग रुममध्येही घेण्यात आली. विराटला सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार ड्रेसिंग रुममध्ये देण्यात आला.

ड्रेसिंग रुमधील या क्षणांचा एक खास व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य आहेत.

Virat Kohali | India vs Australia
Virat Kohli Fan: 'मी 40 तासांहून अधिक...', विराटने चेन्नईतील फॅनचा दिवस बनवला स्पेशल, पाहा Video

या सामन्यात विराटने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या 2 धावात 3 विकेट्स गेलेल्या असताना 85 धावांची खेळी केली. त्याने ही खेळी करताना केएल राहुलबरोबर 165 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारीही केली. त्यामुळे भारताला 42 षटकातच विजय मिळवणे सोपे गेले. केएल राहुलने नाबाद 97 धावा केल्या.

फलंदाजीपूर्वी विराटने क्षेत्ररक्षण करताना दोन झेल देखील घेतले होते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या मिचेल मार्शचा जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर विराटने स्लीपमध्ये शानदार झेल घेतला होता. तसेच त्याने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर ऍडम झम्पाचा झेल घेतला होता.

त्याच्याशिवाय या सामन्यात श्रेयस अय्यरनेही पॅट कमिन्सचा डाईव्ह करत झेल घेतलेला, तर मिचेल स्टार्कचा पळत येत झेल घेतला होता.

याबद्दल विराट आणि श्रेयस या दोघांचेही भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये कौतुक केल्याचे बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते. व्हिडिओमध्ये दिसते की भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणत आहे की 'आपण ज्या गोष्टी करतो, त्यात थोडा बदल केला आहे. दिलीप सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला पदक देईल.'

Virat Kohali | India vs Australia
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया 199 धावांवर 'ऑलआऊट', कशा गेल्या सर्व विकेट्स, पाहा Video

त्यानंतर भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी म्हटले की 'शेवटी आपल्याला हे मिळाले. आजच्या सामन्यामध्ये इशान किशनचीही चांगली कामगिरी झाली. श्रेयसनेही शानदार दोन झेल घेतले. पण आपण संघात ज्याबद्दल नेहमी बोलतो, ते म्हणजे सातत्य.'

'हे फक्त एका झेलपुरते नाही. हे त्या जिद्दीसाठी आहे आणि पाठिंब्याबद्दल आहे. हे फक्त तुमचे काम करण्यासाठी नाही, तर इतर खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी आणि योग्य क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी ठेवण्यासाठीही आहे. हे पदक विराट कोहलीला मिळत आहे.'

विराटचे नाव घेतल्यानंतर इतर खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये कल्ला केला आणि मग विराटने हसत दिलीप यांना ते मेडल त्याच्या गळ्यात घालण्यास सांगितले. त्यानंतर तो थोडा मस्ती करत पदक सर्वांना दाखवून ते त्याने चावले.

बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाज करताना 49.3 षटकात सर्वबाद 199 धावा केल्या होत्या.

तथापि आता भारताला वर्ल्डकप 2023 मधील दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध बुधवारी (11 ऑक्टोबर) खेळायचा आहे. हा सामना दिल्लीला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com