Ranveer Singh Joins Golmaal 5: 'गोलमाल 5'मध्ये अजय देवगणची जागा घेणार रणवीर सिंग?

दिग्दर्शक रोहित शेट्टीची माहिती, 'सर्कस' चित्रपटाचा ट्रेलर रीलीज
Ranveer Singh Joins Golmaal 5
Ranveer Singh Joins Golmaal 5Dainik Gomantak

Ranveer Singh Joins Golmaal 5: रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भुमिका असलेल्या 'सर्कस' या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी याने त्याच्या गाजलेल्या गोलमाल या चित्रपट फ्रँचायजीतील 'गोलमाल 5' या पाचव्या भागाचीही घोषणा केली. विशेष म्हणजे 'गोलमाल 5'मध्ये रणवीर सिंग असणार आहे, असेही त्याने सांगितले.

Ranveer Singh Joins Golmaal 5
Shahrukh Khan Upcoming Movie: किंग ऑफ रोमान्स आता 'अ‍ॅक्शन'च्या प्रेमात

गोलमाल 5 मध्ये रणवीर सिंग असल्याने त्यामुळे रणवीरचा रोहितसोबत हा चौथा चित्रपट ठरेल. यापुर्वी त्यांनी सिम्बा आणि त्यानंतर अक्षयकुमारच्या सूर्यवंशी चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर सर्कस आणि पुढे गोलमाल 5 या चित्रपटात ते एकत्र येत आहेत.

गोलमाल चित्रपटाचे सर्व पार्ट सुपरहिट ठरले आहेत. या चित्रपटात अजय देवगणचे गोपाळ हे कॅरेक्टर आहे. आता रणवीर सिंग गोलमालमध्ये असल्याने तो अजय देवगनची जागा घेणार का, अशी शंका चाहत्यांना आली. पण रोहित शेट्टीने रणवीर सिंग गोलमाल 5 मध्ये कॅमियो साकारणार असून चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत काहीही अपडेट अद्याप रोहितने दिलेली नाही.

Ranveer Singh Joins Golmaal 5
Jubin Nautiyal: कोपर फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत; प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल अपघातात गंभीर जखमी

दरम्यान, सर्कस हा एक मल्टीस्टारर चित्रपट असन यात जॅकलीन फर्नांडीस, पुजा हेगडे, वरुण शर्मा, टीकू तलसानिया, जॉनी लीवर, संजय मिश्रा यांच्याही भुमिका आहेत.

शेक्सपियरचे नाटक कॉमेडी ऑफ एरर्सवर आधारीत आणि गुलजार दिग्दर्शित अंगुर या चित्रपटाचा सर्कस हा रीमेक असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोनचादेखील कॅमियो असणार आहे. चित्रपटात रणवीर आणि वरूणचा डबलरोल असणार आहे. 23 डिसेंबर रोजी हा चित्रपट रीलीज होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com