Shahrukh Khan Upcoming Movie: किंग ऑफ रोमान्स आता 'अ‍ॅक्शन'च्या प्रेमात

पुढील 10 वर्षे अ‍ॅक्शन चित्रपटच करणार, 'डंकी'चे शूटिंग पुर्ण
Bollywood actor Shahrukh Khan
Bollywood actor Shahrukh KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Shahrukh Khan Annoucement: बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान याच्या आगामी तीन चित्रपटांपैकी दोन चित्रपट अॅक्शनपॅक्ड असणार आहेत. यातील एक म्हणजे 'जवान' आणि दुसरा म्हणजे 'पठान'. पण आता केवळ हे दोनच नाही तर शाहरूखचे आगामी बहुतांश चित्रपट अॅक्शनपटच असणार आहेत. किंग खानने स्वतःच तसे सांगितले आहे. त्यामुळे आता हा किंग ऑफ रोमान्स चक्क अॅक्शनच्या प्रेमात असल्याचे दिसून येत आहे.

Bollywood actor Shahrukh Khan
Jubin Nautiyal: कोपर फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत; प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल अपघातात गंभीर जखमी

एका मुलाखतीत शाहरूख म्हणाला की, मी सध्या 57 वर्षांचा आहे आणि आगामी दहा वर्षे केवळ अॅक्शन चित्रपटच करणार आहे. हॉलीवुडच्या सुप्रसिद्ध मिशन इम्पॉसिबल या चित्रपट फ्रँचायजीसारखे चित्रपट त्याला करायचे आहेत. पठान चित्रपटापुर्वी मला अॅक्शनपटांसाठी योग्य समजले जात नव्हते. पण आता माझे पुर्ण लक्ष अॅक्शन चित्रपट करण्यावरच असणार आहे.

शाहरूख म्हणाला की, मी आत्तापर्यंत कोणताही अॅक्शनपट केला नव्हता. मी खूप लव्हस्टोरीज केल्या. सोशल ड्रामा असलेल्या फिल्म्स केल्या. काही व्हिलनचेही चित्रपट केले, पण अॅक्शनपट केला नव्हता. आगामी काळात मला मिशन इम्पॉसिबल सारखे चित्रपट करायचे आहेत.

Bollywood actor Shahrukh Khan
Salman Khan Ex-Girlfriend : सोमी अलीचा सलमानवर गंभीर आरोप; म्हणाली सलमानने मला सिगारेटने चटके दिले आणि...

शाहरूखने नुकतेच राजकुमार हिराणी दिग्दर्शित डंकी या चित्रपटाचे शुटिंग पुर्ण केले आहे. त्यानंतर तो मक्का येथे जाऊन आला आहे. दरम्यान, शाहरूखच्या आगामी पठान या चित्रपटाचे नवे पोस्टरही रीलीज करण्यात आले आहे. पठान चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोन आणि जॉन अब्राहम देखील असणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com