Annual Contract: BCCI चा मोठा निर्णय! श्रेयस अय्यर-इशान किशनला करारात जागा नाहीच; पाहा करारबद्ध खेळाडूंची संपूर्ण यादी

BCCI annual player Contracts: बीसीसीआयने भारतीय पुरुष संघाचा वार्षिक मानधन करार जाहीर केला असून या करारात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना स्थान देण्यात आलेले नाही.
Shreyas Iyer - Ishan Kishan | BCCI announces annual player Contracts 2023-24 for Team India
Shreyas Iyer - Ishan Kishan | BCCI announces annual player Contracts 2023-24 for Team IndiaX/ICC

BCCI announces annual player Contracts 2023-24 for Team India:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी (28 फेब्रुवारी) भारताच्या वरिष्ठ संघाच्या 2023-24 वार्षिक मानधन कराराची घोषणा केली आहे. या करारासाठी 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 हा कालावधी ग्राह्य धरण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांप्रमाणेच चार विभागात खेळाडूंना करार देण्यात आले आहेत. यामध्ये ए+, ए, बी, सी असे चार विभाग आहेत. या चार विभागात असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी असे मानधन दिले जाते.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोन्ही खेळाडूंना या कराराच्या यादीतून बाहेर केले आहे. याबाबत कोणतेही कारण दिलेले नाही.

मात्र, इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकव्याचे कारण देऊन पुन्हा परतल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळले नव्हते.

त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्या खेळल्यानंतर श्रेयस अय्यरला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तोही मुंबईकडून रणजी ट्रॉफीचा सामने खेळला नाही. त्याचमुळे त्यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

Shreyas Iyer - Ishan Kishan | BCCI announces annual player Contracts 2023-24 for Team India
IND vs ENG: टीम इंडियाला धक्का! आर अश्विनची तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार, BCCI ने सांगितलं कारण

बीसीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे ए+ विभागात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंना स्थान दिले आहे. त्याचबरोबर ए विभागात 6 खेळाडूंना स्थान दिले आहे. या विभागात हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, शुभमन गिल यांना बढती मिळाली आहे.

बी विभागात 5 खेळाडू आहेत. यात ऋषभ पंतलाही ठेवण्यात आले आहे. पंत गेल्या वर्षभरापासून अपघातामुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण येत्या काही महिन्यात तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विभागात यशस्वी जयस्वाललाही स्थान मिळाले आहे.

सी विभागात सध्या 15 खेळाडू आहेत. यामध्ये रिंकू सिंग, शिवम दुबे, जितेश शर्मा, मुकेश कुमार, रजत पाटीदार अशा खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे.

कोणते खेळाडू ठरले पात्र?

बीसीसीआयने माहिती दिली आहे की निर्धारित कालावधीत जे खेळाडू कमीत कमी 3 कसोटी किंवा 8 वनडे किंवा 10 टी20 सामने खेळले आहेत, ते आपोआपच सी विभागात सामील करण्यात आले आहेत.

हे लक्षात घेता ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांनी सध्या 2 कसोटी सामने खेळले आहेत, पण जर ते इंग्लंडविरुद्ध 7 मार्चपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळले, तर त्यांना सी विभागात सामील केले जाणार आहे.

याशिवाय निवड समीतीने वेगवान गोलंदाजांच्या करारासाठी आकाश दीप, विजयकुमार वैशाख, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वख कावरेप्पा यांच्या नावाची शिफारस केली आहे.

Shreyas Iyer - Ishan Kishan | BCCI announces annual player Contracts 2023-24 for Team India
IND vs ENG, Video: रांची कसोटीदरम्यान BCCI प्रोडक्शन टीमने दंडाला का बांधली काळी फित? 'हे' आहे कारण

बीसीसीआयचा खेळाडूंना महत्त्वाचा इशारा

दरम्यान, हा करार जाहीर करताना बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की सर्व खेळाडूंनी ज्यावेळी ते भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसतील, तेव्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सामील व्हावे.

बीसीसीचा वार्षिक मानधन करार (2023-24)

ए+ विभाग

  • रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ए विभाग

  • आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.

बी विभाग

  • सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल.

सी विभाग

  • रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com