Test Incentive Scheme: टीम इंडियाचा मालिका विजय झाला आणखी गोड, कसोटीसाठी BCCI ची नवी स्किम, खेळाडू होणार मालामाल

BCCI's Test Cricket Incentive Scheme: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाला बीसीसीआयने 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' सुरू केली आहे. यातून खेळाडूंसाठी मोठी बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.
Team India | Test Cricket
Team India | Test CricketX/BCCI

BCCI announced Test Cricket Incentive Scheme

भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (9 मार्च) इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे झालेल्या कसोटी मालिकेतील पाचवा सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. यासह भारताने पाच सामन्यांची ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. भारताने मायदेशात जिंकलेली ही सलग 17 वी कसोटी मालिका आहे.

या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय कसोटीपटूंना गोड बातमी दिली आहे. बीसीसीआयने 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' सुरू केली आहे. बीसीसीआयने सांगितल्यानुसार यातून कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन तर दिले जाईल, तसेच भारतीय खेळाडूंना प्रोत्साहनपर भत्ताही दिला जाईल, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य देखील मिळेल.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत घोषणा केली आहे.

Team India | Test Cricket
IND vs ENG: चाळीशीतही अँडरसनचा जलवा! कुलदीपची विकेट घेत 'हा' भीमपराक्रम करणारा जगातील पहिलाच फास्ट बॉलर

त्यांनी पोस्टमध्ये माहिती दिली की 'मला वरिष्ठ पुरुष भारतीय संघातील खेळाडूंसाठी 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' सुरु करत असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. आमच्या खेळाडूंची आर्थिक प्रगती व्हावी आणि त्यांना स्थैर्य मिळावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.'

'ही योजना 2022-23 हंगामापासून लागू करण्यात आली आहे. ही योजना सध्याच्या सामनाशुल्क 15 लाखाच्या वर अतिरिक्त बक्षीसाची संरचना म्हणून काम करेल.'

दरम्यान, या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे साधारण एका हंगामात 9 कसोटी सामने खेळले जातात, असे ध्यानात घेऊन ही 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' आखण्यात आली आहे.

Team India | Test Cricket
IND vs ENG: अश्विनने 100 वी कसोटी बनवली सुपर स्पेशल! 5 विकेट्ससह कुंबळेला मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक

त्यामुळे एका हंगामात 50 टक्क्यापेक्षा कमी खेळणारे म्हणजेच 4 पेक्षा कमी कसोटी सामने खेळणारे खेळाणारे खेळाडू या योजनेसाठी पात्र नसतील.

एका हंगामात 5 किंवा 6 कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनध्ये खेळल्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी 30 लाख रुपये दिले जातील, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये न खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी 15 लाख रुपये दिले जातील.

तसेच एका हंगामात 7 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेले खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्यास प्रत्येक सामन्यासाठी 45 लाख रुपये दिले जातील, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या खेळाडूला 22.5 लाख रुपये प्रत्येक सामन्यासाठी दिले जातील.

दरम्यान, बीसीसीआय सध्या कसोटी क्रिकेटवर भर देताना दिसत आहे. यापूर्वीच बीसीसीआयने हे देखील स्पष्ट केले आहे की भारतीय खेळांडूंनी राष्ट्रीय संघात नसताना देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com