World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 मधून श्रीलंका आऊट, बांगलादेशने 3 गडी राखून जिंकला सामना!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 38 वा सामना बांगलादेशविरुद्ध श्रीलंका यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.
Bangladeshi Player
Bangladeshi PlayerDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 38 वा सामना बांगलादेशविरुद्ध श्रीलंका यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 3 विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह बांगलादेशने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून श्रीलंकेला बाहेरचा रस्ता दाखवला.

दरम्यान, या सामन्यात नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने चरिथ असलंकाच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशला 280 धावांचे लक्ष्य दिले होते. बांगलादेशने (Bangladesh) नझमुल हुसेन शांतो (90) आणि शकीब अल हसन (82) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर अवघ्या 41.1 षटकांत या धावसंख्येचा पाठलाग केला.

दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी झाली. आणि हीच भागीदारी बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. येथून श्रीलंकेने सामान्यात पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांना सामना जिंकता आला नाही.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये बांगलादेश संघाने हा एक सामना जिंकला. याआधी बांगलादेश तीन सामने पराभूत झाला होता.

या सामन्यात श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने 3 बळी घेतले. तर महिश तिक्षणा आणि अँजेलो मॅथ्यूज यांना अनुक्रमे 2 विकेट्स मिळाल्या.

Bangladeshi Player
World Cup 2023: भारत-द. आफ्रिका सेमी-फायनलमध्ये, तर दोन जागांसाठी 6 संघात स्पर्धा, जाणून घ्या समीकरण

सामन्यादरम्यान टाइमआऊटचा वाद झाला

दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेच्या (Sri Lanka) डावात अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट देण्यात आले. 146 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या फलंदाजाला अशाप्रकारे आऊट देण्यात आले. 25व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सदीरा बाद झाल्यानंतर मॅथ्यूज मैदानात आला, मात्र तो खेळपट्टीवर पोहोचताच त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली.

त्यानंतर मॅथ्यूजने दुसरे हेल्मेट मागितले, परंतु बांगलादेश कर्णधार शाकिब अल हसनने अपील केले, ज्यावर मैदानातील पंचांनी मॅथ्यूजला टाईम आऊट म्हटले.

अशाप्रकारे षटकाचा पुढचा चेंडू टाकण्यापूर्वीच मॅथ्यूज एकही चेंडू न खेळता बाद झाला. अशा प्रकारे बांगलादेशला एकाच चेंडूवर दोन विकेट मिळाल्या.

बांगलादेशच्या फलंदाजांच्या विकेट्स

पहिली विकेट: तनजीद हसन (9) विकेट- दिलशान मदुशंका, 17/1

दुसरी विकेट: लिटन दास (23) विकेट- दिलशान मदुशंका, 41/2

तिसरी विकेट: शकिब अल हसन (82) विकेट- अँजेलो मॅथ्यूज, 210/3

चौथी विकेट: नजमुल हुसेन शांतो (90) विकेट- अँजेलो मॅथ्यूज, 211/4

पाचवी विकेट: मुशफिकर रहीम (10) विकेट- दिलशान मदुशंका, 249/5

सहावी विकेट: महमुदुल्ला (22) विकेट- महिश तिक्ष्णा, 255/6

सातवी विकेट: मेहदी हसन मिराज (3) विकेट- महिष तिक्षणा, 269/7

Bangladeshi Player
World Cup 2023: टीम इंडियाचा महारेकॉर्ड! आजपर्यंत वनडे इतिहासात कोणत्याही संघाने केला नाही 'हा' पराक्रम

असलंकाने संस्मरणीय शतकी खेळी खेळली

दुसरीकडे, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात श्रीलंकेने कुसल परेराची विकेट गमावली. यानंतर कुसल मेंडिस आणि पाथुम निसांका यांनी 61 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला.

मेंडिसने 30 चेंडूत 19 धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. तर पथुम निसांकाने 36 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या.

मात्र, निसांका बाद झाल्यानंतर चरित असलंकाने श्रीलंकेची धावगती वाढवली. असलंकाने बांगलादेशी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत 108 धावा केल्या. असलंकाने आपल्या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. सदीरा समरविक्रमा आणि धनंजय डी सिल्वा यांनी असलंका चांगली साथ दिली.

सदिराने चार चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या तर डी सिल्वाने 34 धावा (4 चौकार, एक षटकार) केल्या. असालंकाच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने 49.3 षटकांत 279 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, बांगलादेशकडून तनझिम हसन शाकिबने सर्वाधिक तीन खेळाडूंना बाद केले.

Bangladeshi Player
World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 मधून श्रीलंका आऊट, बांगलादेशने 3 गडी राखून जिंकला सामना!

श्रीलंका आणि बांगलादेश विश्वचषकातून आऊट

यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंका आणि बांगलादेशची कामगिरी अत्यंत खराब झाली. बांगलादेश उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे, तर या पराभवानंतर श्रीलंका संघाच्या आशाही संपुष्टात आल्या. चालू विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाने 8 पैकी फक्त दोनच सामने जिंकले. तर बांगलादेशनेही 8 पैकी 2 सामने जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

FIFA World Cup 2026 Prize Money
FIFA World Cup 2026 Brazil squad
World Record 8 Sixes In Cricket
Sri Lanka Under-19 Cricket Scandal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com