Sachin Tendulkar: जाहिरातीमुळे वाद! मास्टर-ब्लास्टरच्या घरासमोर आमदार बच्चू कडूंचे आंदोलन

Bachchu Kadu Protest against Sachin Tendulkar: भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घरासमोर महाराष्ट्रातील आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले आहेत.
Sachin Tendulkar | Bachchu Kadu
Sachin Tendulkar | Bachchu KaduDainik Gomantak

Bachchu Kadu Protest against India Cricketer Sachin Tendulkar for Online Gaming advertisement:

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरविरुद्ध महाराष्ट्रातील आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केले आहे. सचिनने ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे प्रमुख नेते बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

त्यांनी सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील वांद्रे येथील घरासमोर त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन केले आहे. सध्या त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून भारतरत्न सचिनच्या घराभोवतीही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बच्चू कडू यांनी यापूर्वीच ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरीती करण्याबद्दल मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करण्याची इशारा दिला होता. तसेच त्यांनी सचिनला लीगल नोटीसही पाठवल्याचे सांगितले होते.

Sachin Tendulkar | Bachchu Kadu
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरला मिळाली मोठी जबाबदारी, निवडणूक आयोगाने बनवले नॅशनल आयकॉन

त्याचबरोबर बच्चू कडू यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिले होते, ज्यात त्यांनी सचिन तेंडुलकरने केलेल्या ऑनलाईन गेमिंग जाहिरातींबद्दल आक्षेप घेतला होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच तो आदर्श खेळाडू म्हणून समजला जात असून त्याचे करडो चाहते आहेत. त्यामुळे त्याने केलेल्या जाहिरातींचा परिणात जनतेवर होत असून अशाप्रकारच्या जाहिरातींना बळी पडून जनतेचे नुकसान होत आहे.

सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्ट गेम या फँटेसी गेमच्या जाहिरातीमध्ये दिसला होता. त्यानंतरच बच्चू कडू आक्रमक झाले होते.

Sachin Tendulkar | Bachchu Kadu
Sachin Tendulkar : 'मी फेडररसारखे कार्लोसलाही 10-12 वर्षे...', मास्टर-ब्लास्टरकडून विम्बल्डन विजेत्याचं तोंडभरून कौतुक

सचिन तेंडुलकरला तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता.

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या पुरस्काराने सन्मानित होणारा सचिन पहिलाच आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचा या पुरस्कारने गौरव करण्यात आला होता.

सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताकडून 664 सामने खेळताना सर्वाधिक 34357 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 100 शतकांचा आणि 164 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच सचिनने 201 विकेट्सही घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा, सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतके करणाराही खेळाडू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com