Cricketer Retirement: T20 विश्वचषकापूर्वी मोठा धक्का; स्टार खेळाडूनं अचानक केली निवृत्तीची घोषणा, पोस्ट करत म्हणाला...

Kane Richardson Announced Retirement: आगामी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अवघ्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Kane Richardson Announced Retirement
Kane Richardson Announced RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

आगामी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अवघ्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघापासून दूर असलेला रिचर्डसन २०२१ च्या ऐतिहासिक विश्वविजेत्या संघाचा अविभाज्य भाग होता.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

केन रिचर्डसनने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. आपल्या अचूक टप्प्यासाठी आणि धूर्त गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिचर्डसनने ऑस्ट्रेलियासाठी २५ एकदिवसीय सामन्यांत ३९ बळी घेतले आहेत.

तसेच, टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने ३६ सामन्यांत ४५ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियासाठी आपला शेवटचा सामना २०२३ मध्ये गुवाहाटी येथे भारता विरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो संघात पुनरागमन करू शकला नाही, तरीही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा दरारा कायम होता.

Kane Richardson Announced Retirement
Legends T20 League Goa: शेन वॉटसन, शिखर धवन, हरभजन सिंग खेळणार गोव्यात! वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग क्रिकेटचा थरार

२०२१ च्या विश्वविजेतेपदाचा मानकरी

२०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने जेव्हा पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला, तेव्हा रिचर्डसन त्या विजयी पथकाचा महत्त्वाचा सदस्य होता. केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नाही, तर आयपीएलमध्येही त्याने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. त्याने राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पुणे वॉरियर्स इंडिया या संघांचे प्रतिनिधित्व करताना १५ सामन्यांत १९ गडी बाद केले होते.

Kane Richardson Announced Retirement
Goa Opinion: शिरगाव चेंगराचेंगरी, हडफडे, चिंबल आंदोलन; प्रत्येक प्रकरणात सरकार बॅकफूटवर जातेय

भावूक निरोप

आपली निवृत्ती जाहीर करताना केन रिचर्डसनने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याने स्पष्ट केले की, चालू बिग बॅश लीगच्या (BBL) समाप्तीनंतर तो सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होईल. रिचर्डसनने म्हटले की, "२००९ पासून सुरू झालेला हा प्रवास खूप कष्टाचा आणि आनंदाचा होता. माझ्या कारकिर्दीत मदत करणाऱ्या सर्व प्रशिक्षक, खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. विशेषतः माझ्या सुरुवातीच्या काळात दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि नॉर्दर्न टेरिटरीमध्ये मला साथ देणाऱ्या लोकांचा मी ऋणी आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com