Test Ranking: टीम इंडियाने मॅच जिंकली, पण पहिला क्रमांक गमावला! 'या' संघाने पटकावलं कसोटीचं सिंहासन

ICC Test Ranking: आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून भारतीय संघाला अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे.
Team India
Team IndiaPTI
Published on
Updated on

Australia overtake India to top position at latest ICC Men's Test Team Rankings:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी (5 जानेवारी) ताजी कसोटी संघ क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय संघाला अव्वल क्रमांक गमवावा लागला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने भारताला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिका नुकतीच संपली. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी जिंकला, तर दुसरा सामना भारताने दीडच दिवसाच गुरुवारी (4 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकला. त्यामुळे या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.

दरम्यान ही मालिका चालू असतानाच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातही तीन सामन्यांची कसोटी मालिका चालू होती. या मालिकेतील सध्या तिसरा सामना सिडनीमध्ये चालू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे.

Team India
ICC Test Rankings: वनडेत नंबर 1 बनलेल्या बाबरला कसोटी क्रमवारीत मोठा झटका; केन विल्यमसन अव्वल स्थानी कायम!

दरम्यान, नवी क्रमवारी येण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ 118 गुणांसह बरोबरीवर होते. मात्र भारताची दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाल्याने आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध दोन्ही सामने जिंकल्याने क्रमवारीत बदल झाले.

ताज्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह अव्वल क्रमांकावर आले, तर भारतीय संघ 117 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर 115 गुणांसह इंग्लंड आहे, तर चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे, ज्यांचे 106 गुण आहेत. पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे, त्यांचे 95 गुण आहेत.

Team India
T20 Ranking: ऋतुराज, बिश्नोईची गरुडझेप! टॉप-10 खेळाडूंमध्ये मिळवले स्थान

आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आणि जानेवारी महिन्याच्या अखेरीस चालू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान क्रमवारीत पुन्हा बदल होऊ शकतात.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका 11 मार्चपर्यंत चालणार आहे. या मालिकेतील सामने हैदराबाद, विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला या पाठ शहरांमध्ये होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com