ICC Test Rankings: वनडेत नंबर 1 बनलेल्या बाबरला कसोटी क्रमवारीत मोठा झटका; केन विल्यमसन अव्वल स्थानी कायम!

ICC Test Rankings: कसोटी सामन्यांचा हंगाम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे.
Babar Azam
Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

ICC Test Rankings: कसोटी सामन्यांचा हंगाम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे, त्यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. आता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्याच दिवसापासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळणार आहे. कसोटी सामने सुरु होताच आयसीसी कसोटी क्रमवारीतही बदल सुरु झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला मोठा झटका बसला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने मात्र मोठी झेप घेतली आहे.

ICC कसोटी क्रमवारीत केन विल्यमसन नंबर वन फलंदाज, जो रुट दुसऱ्या स्थानी

दरम्यान, आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानी कायम आहे. त्याचे रेटिंग 864 आहे. दुसऱ्या स्थानावर जो रुट आहे, ज्याचे रेटिंग 859 आहे. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या रेटिंग आणि क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. तिसर्‍या क्रमांकाबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या स्थानावर आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्याचे रेटिंग घटले आहे, परंतु तो तिसऱ्या स्थानी कायम आहे. गेल्या आठवड्यात त्याचे रेटिंग 842 होते, ते आता 826 वर आले आहे. आता उस्मान ख्वाजा चौथ्या क्रमांकावर आला आहे. गेल्या आठवड्यात 796 रेटिंगसह सातव्या क्रमांकाचा फलंदाज असलेला उस्मान ख्वाजाचे रेटिंग 808 आहे. त्याने थेट सातवरुन चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. यामुळेच बाबर आझम चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी बाबर आझमचे रेटिंग 829 होते, ते आता 801 वर आले आहे.

Babar Azam
ICC Mens Test Batting Rankings: रोहितचा जलवा, फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये मिळवले स्थान; यशस्वी जयस्वालही...

रोहित शर्मा टॉप 10 मध्ये कायम

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड 791 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर कायम आहे, तर न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 786 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, मिशेल आठव्या स्थानावर होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्युशेनला मोठा झटका बसला. तो पाचव्या क्रमांकावरुन थेट आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग सध्या 785 आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक 773 रेटिंगसह नवव्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग 759 आहे. रोहित शर्मा हा टीम इंडियाचा एकमेव खेळाडू आहे, जो कसोटी क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

Babar Azam
ICC Test Rankings 2023: केन विल्यमसनचा जलवा, जो रुटकडून हिरावला नंबर 1 चा मुकुट; स्टीव्ह स्मिथला मोठा फायदा

कसोटी गोलंदाजीत अश्विन नंबर वन, रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंमध्ये चमकला

कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा रविचंद्रन अश्विन अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग सध्या 879 आहे. दुसरीकडे कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, रवींद्र जडेजाने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचे रेटिंग 455 आहे. भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी खेळणार आहे. यानंतर भारतीय खेळाडूंच्या रेटिंग आणि क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com