Australia captain Pat Cummins praises Virat Kohli and Ravindra Jadeja:
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी गेले काही महिने शानदार राहिले आहेत. त्याने काही अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. नुकताच त्याचा आयसीसीकडून 2023 वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला. यानंतर त्याने आता भारतीय खेळाडू विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांचे कौतुक केले आहे.
काही दिवसांपूर्वीच कमिन्सने त्याचा संघसहकारी ट्रेविस हेड, विराट आणि जडेजा यांना मागे टाकत 2023 मधील आयसीसीचा सर गारफिल्ड सोबर्स सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला. हेड, विराट आणि जडेजा यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
दरम्यान, आयसीसीचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकल्यानंतर कमिन्सने विराट आणि जडेजा यांचेही कौतुक केले. विराट भारताचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज असून जडेजा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. कमिन्सने या दोन्ही खेळाडूंच्या भारतीय संघातील प्रभावाबद्दल भाष्य केले आहे.
तो आयसीसीशी बोलताना म्हणाला, 'कोहली आणि जडेजा हे सातत्यपूर्ण आहेत, यापासून त्यांना तुम्ही कधीही लांब ठेवू शकत नाही, ते त्यांच्या संघाला संकाटातून बाहेर काढण्यासाठी आणि जिंकून देण्यासाठी नेहमीच मार्ग शोधून काढतात. अशा खेळाडूंसह मलाही नामांकन मिळाल्याने आनंद आहे.'
तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल कमिन्स म्हणाला, 'हा मोठा सन्मान आहे. हे मोठे वर्ष होते, ज्यात संघाला मोठे यश मिळाले आणि आता हा वैयक्तिक सन्मान मिळणे ही खरंच मोठी गोष्ट आहे. आपण सांघिक खेळ खेळतो, जिथू तुम्ही संघ जिंकावा, यासाठी खेळता आणि तुम्ही एकत्र मिळून स्पर्धा आणि ट्रॉफी जिंकता. वैयक्तिक प्रशंसेबाबत हे सर्वात उच्च आहे.'
कमिन्ससाठी 2023 वर्ष शानदार राहिले. त्याने कर्णधार म्हणून ऍशेस ट्रॉफी राखली, तसेच 2021-23 कसोटी चॅम्पियनशीप आणि 2023 वनडे वर्ल्डकपही जिंकला.
त्याचबरोबर त्याने 2023 वर्षात 24 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतल्या, तर 422 धावाही केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.