Ashes 2023: तब्बल 6037 दिवसांनी ऍशेसमध्ये 'असं' घडलंय! दोन दिग्गजांविना उतरले इंग्लंड-ऑस्ट्रेलिया

ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा सामना लीड्सला खेळवला जात आहे.
England vs Australia
England vs AustraliaDainik Gomantak
Published on
Updated on

Ashes 2023, Australia vs England, Leeds Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा सामना 6 जुलैपासून सुरू होत आहे. हा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, हा सामना एका वेगळ्या गोष्टीमुळेही चर्चेत आहे.

या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांची प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. या ११ जणांच्या संघात इंग्लंडने दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला स्थान दिलेले नाही. तसेच ऑस्ट्रेलियाला या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायन पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित ऍशेस मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे तोही या सामन्यात खेळणार नाही.

त्याचमुळे तब्बल 6037 दिवसांनी ऍशेसमध्ये असे चित्र दिसणार आहे की अँडरसन आणि लायन या दोन दिग्गज गोलंदाजांशिवाय सामना खेळला जाणार आहे.

डिसेंबर 2006 पासून झालेल्या सर्व ऍशेस सामन्यांत किमान अँडरसन किंवा लायन यांच्यापैकी एकजण किंवा दोघेही खेळले आहे. मात्र, लीड्सला होणाऱ्या ऍशेस 2023 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हे दोघेही दिसणार नाहीयेत.

England vs Australia
Ashes 2023: 'याचसाठी तू आठवणीत राहशील...' बेअरस्टोच्या विकेटवर चिडलेल्या ब्रॉडनं लाईव्ह सामन्यात कॅरेला सुनावलं

अँडरसनने 26 डिसेंबर 2006 रोजी पहिला ऍशेस सामना खेळला होता. तसेच लायनने ३१ ऑगस्ट 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीतून पदार्पण केले होते. विशेष म्हणजे लायनने त्याच्या कारकिर्दीत 122 कसोटी सामने खेळलेत. यातील गेले सलग 100 कसोटी सामने खेळलल्यानंतर तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटी सामना खेळताना दिसणार नाहीये.

अँडरसनने त्याच्या कारकिर्दीत 181 कसोटी सामन्यांमध्ये 688 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लायनने 122 कसोटीत 496 विकेट्स घेतल्या आहेत.

England vs Australia
Steve Smith Century Ashes 2023: स्मिथचा जलवा! विक्रमी 32 वे शतक ठोकत सचिन, पाँटिंग अन् ब्रॅडमनलाही टाकलं मागे

स्मिथचा 100 वा कसोटी

स्मिथसाठी लीड्सला होणारा कसोटी सामना कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून 100 कसोटी सामने खेळणारा 16 वा खेळाडू आहे.

लीड्स कसोटीसाठी संघ

  • इंग्लंड - झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड

  • ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, स्कॉट बोलंड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com