Indian Super League: एटीके मोहन बागानची अपराजित कूच

एटीके मोहन बागानने (ATK (Mohun Bagan) मंगळवारी आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत अपराजित कूच राखली.
ATK Mohun Bagan
ATK Mohun BaganDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतकीय स्ट्रायकर लिस्टन कुलासो आणि मानवीर सिंग यांनी तीन मिनिटांच्या अंतराने केलेल्या गोलच्या बळावर एटीके मोहन बागानने (ATK (Mohun Bagan) मंगळवारी आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत अपराजित कूच राखली. त्यांनी अव्वल स्थानावरील हैदराबाद एफसीला (Hyderabad FC) पराभवाचा झटका देताना 2-1 फरकाने विजय संपादन केला. (ATK (Mohun Bagan Defeated Hyderabad FC In The Indian Super League Football Tournament)

बांबोळी येथील स्टेडियमवर झालेल्या लढतीत सर्व गोल उत्तरार्धातील खेळात झाले. लिस्टनने 56व्या मिनिटास डेव्हिड विल्यम्सच्या असिस्टवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला चकविले. लिस्टनचा हा मोसमातील सहावा गोल ठरला. यंदा स्पर्धेत भारतीयांतर्फे सर्वाधिक गोल करण्याचा मान त्याने मिळविला आहे. लिस्टन सामन्याचाही मानकरी ठरला. आणखी दोन वेळा संधी साधली असती, तर लिस्टनला हॅटट्रिकचा मान मिळवता आला असता.

ATK Mohun Bagan
Indian Super League: एफसी गोवाने ओडिशा एफसीला बरोबरीत रोखले

मोसमातील वैयक्तिक दुसरा गोल करताना मानवीर याने 59व्या मिनिटास जॉनी कौको याच्या असिस्टवर हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. 67व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन खेळाडू जोएल चिनेज याच्या गोलमुळे हैदराबादला पिछाडी कमी करता आली. मागील तीन सामन्यांत पाच आणि स्पर्धेत सर्वाधिक 14 गोल केलेला हैदराबादचा नायजेरियन स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याला मंगळवारी गोल करण्यात अपयश आले.

ATK Mohun Bagan
Indian Super League: यंदाच्या संपूर्ण लीग मोसमात आम्ही कमनशिबी ठरलो : डेरिक

एटीके मोहन बागान (ATK Mohun Bagan) आता स्पर्धेत सलग नऊ सामने अपराजित आहे. या कालावधीत त्यांनी चार विजय व पाच बरोबरी अशी कामगिरी केली आहे. त्यांचा हा स्पर्धेतील एकंदरीत सहावा विजय ठरला. त्यांचे आता 13 सामन्यांतून 23 गुण झाले आहेत. समान गुण झाल्यानंतर गोलसरासरीत केरळा ब्लास्टर्स दुसऱ्या, बंगळूर एफसी तिसऱ्या, तर एटीके मोहन बागान चौथ्या स्थानी आहे. मंगळवारच्या लढतीपूर्वी सलग तीन सामने जिंकलेल्या हैदराबादला मोसमात तिसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले. त्यांचे 15 लढतीनंतर 26 गुण कायम असून अग्रस्थानावर परिणाम झालेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com