Indian Super League: यंदाच्या संपूर्ण लीग मोसमात आम्ही कमनशिबी ठरलो : डेरिक

मागील काही सामन्यांत वर्चस्व राखूनही विजयाने हुलकावणी दिली.
Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League: एफसी गोवाची आठव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी अतिशय खराब असून मागील काही सामन्यांत वर्चस्व राखूनही विजयाने हुलकावणी दिली. याबाबतीत मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी नशिबाला दोष दिला आहे.

यंदाच्या संपूर्ण लीग मोसमात आम्ही कमनशिबी ठरलो, असे मत जमशेदपूर एफसीविरुद्ध (Jamshedpur FC) शुक्रवारी रात्री एका गोलने पराभूत झाल्यानंतर डेरिक यांनी व्यक्त केले. त्या लढतीत एफसी गोवाने (FC Goa) वर्चस्व राखले, पण गोल नोंदविता आला नाही. संधी हुकल्या, त्यांच्या खेळाडूचे फटके गोलपोस्टला आपटले.

Indian Super League
Goa Election: सासष्टीतील बहुतांश उमेदवार गर्भश्रीमंत

59 वर्षीय डेरिक म्हणाले, ‘‘आम्ही सर्व काही केलंय. सामन्यातील पहिली 15-20 मिनिटे आम्ही चांगला खेळ केला. त्यांनी (जमशेदपूर) दबाव टाकण्यास सुरवात केल्यानंतरही आम्ही मजबूत खेळ केला. दुसऱ्या अर्धात गोल करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. किमान दोन वेळा फटके पोस्टला आपटले. पूर्ण मोसमात नशिबाने आम्हाल साथ दिलेली नाही. आता आम्हाला पुढील विजयासाठी प्रयत्न करावे लागतील.’’

चुकांमुळे गोल स्वीकारले

शुक्रवारी रात्री एफसी गोवाने जमशेदपूरचे आक्रमक खेळाडू ग्रेग स्टुअर्ट, डॅनियल चिमा चुक्वू यांच्यासह ईशान पंडितावरही सक्त पहारा ठेवला. पण चिमा याच्या एका फटक्याने सामन्याचे पारडे पालटले. या गोलविषयी डेरिक म्हणाले, ‘‘आमच्या काही खेळाडूंमते तो गोल ऑफसाईड होता, पण मला खात्री नाही. मला पुन्हा पाहावे लागेल. ते खरं असले, तरी डोळेझाक करता येणार नाही. पूर्ण मोसमात हे असंच घडत आहे. साध्यासोप्या चुकांमुळे आम्ही गोल स्वीकारतोय आणि नंतर सामन्यात पुनरागमन करण्यासाठी धडपतो.’’

Indian Super League
Goa Sports: ‘सुपरसब’ कियान नासिरीचा हॅट्रिक जलवा

ब्रँडन हा महत्त्वपूर्ण खेळाडू

तंदुरुस्तीनंतर ब्रँडन फर्नांडिस बंगळूर एफसीविरुद्ध सात मिनिटे खेळला, जमशेदपूरविरुद्ध ८२ मिनिटे खेळताना त्याने दमदार कामगिरी केली. गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर हा अनुभवी मध्यरक्षक पुनरागमन करत आहे. त्याविषयी डेरिक म्हणाले, की ‘‘ब्रँडन हा दर्जेदार खेळाडू आहे. संघात तो, तसेच आल्बेर्टो (नोगेरो) व प्रिन्सटन (रिबेलो) असल्याने आम्ही चांगल्याप्रकारे चेंडू खेळवत आहोत. ब्रँडन असा खेळाडू आहे, जो इतरांसाठी संधी निर्माण करतो. सेटपिसेसवरील त्याचे फटके धोकादायक असतात. त्यामुळे आमच्यासाठी तो खूप, खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो ऐंशी मिनिटे खेळला यामुळे मी आनंदित आहे.’’

आता ‘करा किंवा मरा’

आयएसएल (Indian Super League) स्पर्धेतील पुढील सामने एफसी गोवासाठी महत्त्वाचे आहेत. ते 14 गुणांसह नवव्या स्थानी आहेत. मागील नऊ सामन्यांत त्यांनी एकच विजय नोंदविला आहे. प्ले-ऑफ फेरीसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी पुढील प्रत्येक सामना ‘करा किंवा मरा’ या उक्तीप्रमाणे असल्याचे डेरिक यांनी मान्य केले. एफसी गोवाचा पुढील सामना मंगळवारी (ता. 1) बांबोळी येथे ओडिशा एफसीविरुद्ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com