Asian Games 2023: ऑटो चालकाच्या मुलीचा चीनमध्ये पराक्रम, ॲन्सी सोजनने लांब उडीत जिंकले रौप्यपदक

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या लांब उडी प्रकारात सोमवारी ॲन्सी सोजनने रौप्य पदक जिंकले आहे.
Ancy Sojan
Ancy SojanDainik Gomantak
Published on
Updated on

Asian Games 2023: हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे सुरु ठेवले आहे. भारताच्या ॲन्सी सोजनने महिलांच्या लांब उडीत दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक जिंकले.

तिने अंतिम फेरीत 6.63 मीटरची सर्वोत्तम उडी मारुन रौप्यपदक जिंकले. ती पहिल्या स्थानावर असलेल्या चीनच्या शिकी झिओंगपेक्षा 10 मीटर मागे होती. लांब उडीच्या अंतिम फेरीसाठी सहा प्रयत्न लागतात आणि सर्वोत्तम प्रयत्नांवर पदक निश्चित केले जाते.

सोजनने पाचव्या प्रयत्नात रौप्यपदक जिंकले

सोजनचा पहिला प्रयत्न 6.13 मीटर होता. यानंतर तिने 6.49 मीटर उडी मारली. तिसऱ्या प्रयत्नात सोजनने त्यात सुधारणा करत 6.56 मीटर उडी मारली. चौथ्या प्रयत्नात तिला 6.30 मीटर उडी मारता आली.

पाचव्या प्रयत्नात सोजनने आपली सर्व शक्ती पणाला लावत 6.63 मीटर उडी मारुन रौप्यपदक मिळवले. त्याचवेळी, सुवर्णपदक जिंकणाऱ्या चीनच्या शिकीचे सहा प्रयत्न पुढीलप्रमाणे - 6.62 मीटर, 6.60 मीटर, 6.73 मीटर, 6.62 मीटर, 6.62 मीटर आणि 6.33 मीटर.

भारताची (India) आणखी एक अॅथलीट, शैली सिंग हिने 6.48 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह या स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. हाँगकाँगच्या यान यू एन्गाने 6.50 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्यपदक जिंकले.

Ancy Sojan
Asian Games 2023: सुतीर्था आणि अहिका जोडीचा कारनामा, टेबल टेनिसमध्ये जिंकले कांस्यपदक!

महिलांच्या लांब उडीत पदक जिंकणारे खेळाडू

महिलांच्या लांब उडी प्रकारातील भारताचे हे आठवे पदक आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताला फक्त एक सुवर्णपदक मिळाले आहे, जे अंजू बॉबी जॉर्जने 2002 बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले होते.

सोजन व्यतिरिक्त, नीना वराकिलने 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. अंजू बॉबीने 2006 दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

मर्सी कुट्टनने 1982 दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि एंजल मेरी जोसेफने 1978 च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

क्रिस्टीन फोरेजने 1966 च्या बँकॉक आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि सिल्व्हियाने 1951च्या दिल्ली आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

Ancy Sojan
Asian Games 2023: तेजिंदरपाल सिंग तूरचा जलवा, एशियन गेम्समध्ये सलग दुसऱ्यांदा जिंकलं 'गोल्ड'

ॲन्सी सोजन कोण आहे?

6.63 मीटरची उडी ही सोजनची वैयक्तिक सर्वोत्तम उडी आहे. ही 22 वर्षीय अॅथलीट केरळमधील (Kerala) त्रिशूरची रहिवासी आहे. अनुप जोसेफ असे तिच्या प्रशिक्षकाचे नाव आहे. ती अजूनही शिकत आहे. सोजनने सातवीत असताना प्रशिक्षण सुरु केले होते.

सुरुवातीच्या टप्प्यात तिचे प्रशिक्षक कन्नन मॅश होते. सोजनला तिच्या पालकांनी अॅथलीट बनण्याची प्रेरणा दिली, अन्यथा ती आणखी काही बनली असती.

सोजन म्हणते- मी माझ्या आई-वडिलांची आभारी आहे की, त्यांनी मला खेळायला आणि अॅथलीट होण्यासाठी प्रोत्साहन दिले. ते दोघेही त्यांच्या काळात खेळाडू होते हे माझे भाग्य आहे. यामुळे मी ऍथलेटिक्समध्येही उतरु शकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com