Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोळाफेक प्रकारात भारताच्या तेजिंदरपाल सिंग तूरने सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे.
तेजिंदरने 20.36 मीटर गोळा फेकत सुवर्णपदक पटकावले. पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर तेजिंदरपालने तिसऱ्या प्रयत्नात 19.51 मीटरचा थ्रो केला. त्याचा चौथा थ्रो 20.06 मीटरचा होता, पण पाचवा थ्रो पुन्हा फाऊल झाला.
शेवटच्या थ्रोवर त्याचा सर्वोत्तम प्रयत्न 20.36 मीटर होता, ज्याने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले. तूरने जकार्ता गेम्समध्ये 20.75 मीटर फेक करुन सुवर्णपदक जिंकले होते.
दरम्यान, सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) मोहम्मद डोडा टोलोने 20.18 मीटरसह रौप्यपदक जिंकले तर चीनच्या लिऊ यांगने 19.97 मीटरसह कांस्यपदक जिंकले.
या विजयासह, तूर (2018 जकार्ता, 2023 हांगझोऊ) प्रद्युमन सिंग ब्रार (1954 आणि 1958), जोगिंदर सिंग (1966 आणि 1970) आणि बहादूर सिंग चौहान (1978 आणि 1982) यांच्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा चौथा भारतीय गोळाफेकपटू ठरला.
दुसरीकडे, आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. आज भारताने स्टीपलचेससह 2 सुवर्णपदके जिंकली आहेत.
अविनाश साबळेने भारतासाठी 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याने 8:19:53 मिनिटे वेळ नोंदवत पदक जिंकले.
तर दुसरीकडे, नेमबाजीत भारताने (India) रविवारी दुसरे सुवर्णपदक जिंकले. यासह भारताने अॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक आणि स्पर्धेतील 12वे सुवर्णपदक जिंकले आहे.
या स्पर्धेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. ज्यामध्ये 13 सुवर्ण, 16 रौप्य आणि 16 कांस्य पदकांसह एकूण 45 पदकांचा समावेश आहे. तर चीन 227 पदकांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. कोरिया 120 पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.