Asia Cup फायनलवरही पावसाचे सावट, भारत वि. श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार विजेतेपद?

IND vs SL: आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका संघात रविवारी खेळवला जाणार आहे, पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
India vs Sri Lanka Final
India vs Sri Lanka FinalDainik Gomantak

Asia Cup Final 2023 India vs Sri Lanka Rain Weather Updates:

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (17 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरुवात होणार आहे, पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

दरम्यान, या संपुर्ण स्पर्धेतच पाऊस हा चर्चेचा विषय ठरला आहे. या स्पर्धेतील अनेक सामन्यात पावसाचा अडथळा आला आहे. भारत आणि पाकिस्तान संघातील साखळी फेरीतील सामना रद्द झाला होता, तर याच दोन संघातील सामन्याचा निकाल पावसामुळे राखीव दिवशी लागला होता. याशिवाय देखील अनेक सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे.

India vs Sri Lanka Final
IND vs BAN: रोहित-तिलकला बाद करणारा पदार्पणवीर तान्झिम म्हणतोय, 'ती विकेट स्वप्नवतच...'

रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात देखील पावसामुळे अडथळा येण्याची दाट शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचमुळे त्याचा परिणाम सामन्यावरही होऊ शकतो.

सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार विजेतेपद?

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या अंतिम सामन्यासाठी सोमवारी हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर हा सामना रविवारी पूर्ण झाला नाही, तर सोमवारी पूर्ण केला जाईल.

दरम्यान, राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आलेली असली, तरी सामनाधिकाऱ्यांकडून रविवारीच हा सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पावसामुळे षटके कमी करूनही सामना रविवारीच पूर्ण केला जाऊ शकतो. पण तरी निकाल लागण्यासाठी दोन्ही संघात किमान 20-20 षटकांचा तरी सामना होणे गरजेचे असणार आहे.

India vs Sri Lanka Final
Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या फायनलपूर्वी श्रीलंकेला जबरदस्त धक्का! प्रमुख गोलंदाजाच संघातून बाहेर

मात्र, जर पावसामुळे 20-20 षटकांचाही सामना होऊ शकला नाही, तर सोमवारी राखीव दिवशी हा सामना होईल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की राखीव दिवशी नव्याने सामना सुरू होणार नाही, रविवारी जिथे सामना थांबला तिथूनच सामना पुढे खेळवला जाईल. तसेच जर रविवारी खेळच होऊ शकला नाही, तर सोमवारी पूर्ण सामना खेळवण्याचा प्रयत्न असेल.

परंतु, सोमवारीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जर सोमवारीही हा सामना पूर्ण झाला नाही, तर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, जर असे झाल्यास दोन्ही संघांना विभागून विजेता घोषित केले जाणार आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी 2002 साली भारत आणि श्रीलंका संघात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना पावसामुळेच रद्द झाला होता. त्यावेळी या दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com