IND vs BAN: रोहित-तिलकला बाद करणारा पदार्पणवीर तान्झिम म्हणतोय, 'ती विकेट स्वप्नवतच...'

Tanzim Hasan Sakib: आशिया चषकात भारताविरुद्ध पदार्पण करणाऱ्या तान्झिम हसन साकिबने रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या विकेट्स घेतल्या होत्या.
Tanzim Hasan Sakib
Tanzim Hasan SakibDainik Gomantak

Asia Cup 2023, India vs Bangladesh, Tanzim Hasan Sakib:

शुक्रवारी भारत विरुद्ध बांगलादेश संघात आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोरचा अखेरचा सामना पार पडला. कोलंबोमधील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बांगलादेशने 6 धावांनी विजय मिळवला आणि स्पर्धेचा शेवट गोड केला.

या सामन्यात बांगलादेशच्या विजयात 20 वर्षीय वेगवान गोलंदाज तान्झिम हसन साकिबने मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. त्याने भारताला सर्वात पहिले दोन धक्के दिले होते.

भारतीय संघ बांगलादेशने दिलेल्या 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरला असताना तान्झिमने कर्णधार रोहित शर्मा आणि पदार्पणवीर तिलक वर्माला स्वस्तात माघारी धाडले होते.

Tanzim Hasan Sakib
IND vs BAN: शुभमन गिलचं शतक होऊनही का हरली टीम इंडिया, जाणून घ्या 5 कारणे

रोहितला तान्झिमने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर शुन्यावर बाद केले. तसेच तिलक वर्माला तान्झिमने 5 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे भारताला तीन षटकांच्या आतच दोन विकेट्स गमवाव्या लागल्या. यानंतर केवळ शुभमन गिल आणि अखेरीस अक्षर पटेलने झुंज दिली.

मात्र, अन्य भारतीय फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. गिलने 121 धावांनी शतकी खेळी केली, तर अक्षरने 42 धावा केल्या. त्यामुळे भारताचा डाव 49.5 षटकात 259 धावांवर संपला. दरम्यान सामन्यानंतर तान्झिमला त्याच्या शानदार गोलंदाजीबद्दल विचारले असता त्याने रोहितची विकेट स्वप्नवत ठरल्याचे सांगितले.

तो म्हणाला, 'रोहित भाईची पहिली विकेट स्वप्नवत होती. मी चेंडूच्या टप्प्यावर आणि दिशेवर लक्ष केंद्रीत केले आणि त्याचमुळे मी यशस्वी झालो. जेव्हा माझ्या संघाला मी लाँग स्पेल टाकण्याची गरज होती, त्यासाठी मी मानसिकरित्या स्वत:ला तयार ठेवले होते.'

Tanzim Hasan Sakib
IND vs BAN: शुभमन गिलचं शतक व्यर्थ! भारताचा पराभव करत बांगलादेशने केला शेवट गोड

तसेच या सामन्यात अखेरच्या षटकातही तान्झिमने गोलंदाजी केली होती. त्यावेळी भारताला अखेरच्या दोन चेंडूत 8 धावांची गरज होती, तर बांगलादेशला एका विकेटची गरज होती. यावेळी तान्झिमने यॉर्कर चेंडू टाकला. त्यावर धाव घेताना मोहम्मद शमी धावबाद झाला.

याबद्दल तान्झिम म्हणाला, 'दोन चेंडूत आठ धावा असल्याने परिस्थितीत ताणाची होती. त्यामुळे मी यॉर्कर चेंडू टाकला. आम्ही भारताविरुद्ध चांगला विजय मिळवून परत जाणार आहोत.

दरम्यान तान्झिमच्या गोलंदाजी आकडेवारीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने 7.5 षटके गोलंदाजी करताना 32 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात बांगालदेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तसेच तौहिद हृदोयने 54 धावांची खेळी केली. याशिवाय नसुम अहमदने 44 धावांची खेळी केली. तान्झिमनेही 8 चेंडून नाबाद 14 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com