Asia Cup 2023: चायनामन मोडणार इरफान पठाणचा रेकॉर्ड, पुढच्या दोन सामन्यात घ्याव्या लागणार एवढ्या विकेट्स

Kuldeep Yadav: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Kuldeep Yadav
Kuldeep YadavDainik Gomantak

Kuldeep Yadav: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आशिया कप 2023 मध्ये भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत कुलदीप यादव भारतासाठी सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आला आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.

इरफान पठाणला सहज मागे टाकू शकतो

कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) पाकिस्तानविरुद्ध 5 तर श्रीलंकेविरुद्ध 4 बळी घेतले. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 विकेट्स पूर्ण करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

या स्पर्धेत कुलदीपने आतापर्यंत 9 विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी आशिया कपच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम इरफान पठाणच्या नावावर आहे. आशिया कप 2004 मध्ये त्याने 14 विकेट घेतल्या होत्या.

भारताला अजूनही 15 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर आशिया कपच्या अंतिम सामना खेळायचा आहे.

अशा परिस्थितीत कुलदीपने या दोन सामन्यांत 6 विकेट घेतल्यास तो इरफानचा विक्रम मोडेल. कुलदीपचा सध्याचा फॉर्म पाहता तो इरफानला सहज मागे टाकू शकत.

Kuldeep Yadav
Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज आशिया कपमधून बाहेर!

टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले

कुलदीप यादवने जून 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही तो भारतासाठी सहभागी झाला होता. यावेळीही त्याला वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे.

कुलदीप दुखापतीतून सावरला असून तो टीम इंडियात परतला आहे. त्याने टीम इंडियासाठी 88 एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 विकेट घेतल्या आहेत.

याशिवाय, त्याने भारतासाठी (India) 8 कसोटी सामन्यात 34 आणि 32 टी-20 सामन्यात 52 बळी घेतले आहेत. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

Kuldeep Yadav
Asia Cup 2023: सासरेबुवांनी केलं जावयाचं कौतुक, सुनिल शेट्टीची केएल राहुलला शाबासकीची थाप, अनुष्काही विराटवर खुश

कुलदीप यादवने चमत्कार केला

एकदिवसीय आशिया कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 24 विकेट घेतल्या आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर इरफान पठाण आहे, ज्याने भारताकडून 22 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादव 19 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com