IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध तब्बल 10 वर्षांनी विराटवर ओढावली 'अशी' नामुष्की

Virat Kohli: शनिवारी विराट कोहलीला शाहिन आफ्रिदीने 4 धावांवर त्रिफळाचीत केले होते.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli dismissed for less than 5 runs against Pakistan for first time in the last 10 years:

शनिवारी आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. कँडीतील पाल्लेकेले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. पण भारताच्या डावानंतर पाऊस कायम राहिल्याने पुन्हा सामना सुरु होऊ शकला नाही.

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला विराट 7 व्या षटकात शाहिन आफ्रिदीविरुद्ध खेळताना 4 धावांवर त्रिफळाचीत झाला.

त्यामुळे तब्बल 10 वर्षांतील पाकिस्तानविरुद्धची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही विराटची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. तो पाकिस्तानविरुद्ध यापूर्वी 30 डिसेंबर 2012 रोजी चेन्नई येथे वनडे सामना खेळताना शुन्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर आत्तापर्यंत विराट पाकिस्तानविरुद्ध शुन्यावर बाद झालेला नाही. त्याने गेल्या 10 वर्षात 5 पेक्षा कमी धावा पाकिस्तानविरुद्ध केलेल्या नाहीत.

Virat Kohli
IND vs PAK: इशान किशननं भारताला तारलं, पण केएल राहुलची डोकेदुखी मात्र वाढली

चेन्नई वनडेनंतर विराटने पाकिस्तानविरुद्ध 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 62.64 च्या सरासरीने 688 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान विराटच्या पाकिस्तानविरुद्धच्या एकूण कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर विराटने पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध 14 वनडे सामने खेळले आहेत.

या 14 सामन्यांमध्ये विराटने 45 च्या सरासरीने 540 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने पाकिस्तानविरुद्ध 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 81.33 च्या सरासरीने 488 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

Virat Kohli
IND vs PAK: इशान किशनची ऐतिहासिक खेळी, एमएस धोनीला मागे टाकत केला 'हा' मोठा रेकॉर्ड!

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द

शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होण्याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या होत्या. भारताकडून इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतके केली. इशानने 82 धावांची आणि हार्दिकने 87 धावांची खेळी केली.

पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने सामना रद्द झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com