IND vs PAK: इशान किशनची ऐतिहासिक खेळी, एमएस धोनीला मागे टाकत केला 'हा' मोठा रेकॉर्ड!

India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी येथे हा सामना खेळवला जात आहे.

या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने 66 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या, मात्र युवा फलंदाज इशान किशनची शानदार खेळी पाहायला मिळाली.

इशान किशनची ऐतिहासिक खेळी

इशान किशन (Ishan Kishan) फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाने 48 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. पण संघाच्या डावाची धुरा सांभाळत इशान किशनने 54 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला.

इशान किशनचे हे वनडेतील सलग चौथे अर्धशतक ठरले. यापूर्वी, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके झळकावली होती.

Ishan Kishan
'आमच्याकडे शाहिन, नसीम, रौफ नाही, पण...' IND vs PAK सामन्यापूर्वी कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

असा पराक्रम करणारा धोनीनंतरचा दुसरा यष्टिरक्षक ठरला

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 4 अर्धशतके झळकावणारा इशान किशन एमएस धोनीनंतरचा दुसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. एमएस धोनीने 2011 साली इंग्लंडविरुद्ध सलग चार अर्धशतके झळकावली होती.

ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा इशानला वनडेमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. याआधी त्याने एक, दोन आणि तीन तसेच चार क्रमांकावर फलंदाजी केली आहे. केएल राहुलच्या जागी त्याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.

Ishan Kishan
IND vs PAK: 'फक्त कोहली...कोहलीच...', विराटला पाहताच रौफने ऐकवली व्यथा

इशान किशनने धोनीला मागे टाकले

दरम्यान, या सामन्याच्या सुरुवातीला टीम इंडिया (Team India) खूप अडचणीत दिसत होती, पंरतु इशान- हार्दिकच्या जोडीने टीमला सावरलं. इशान 81 चेंडूत 82 धावा करुन बाद झाला. इशान किशनने या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

आशिया चषकाच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय यष्टीरक्षकही ठरला आहे. याआधी एमएस धोनीने आशिया कपमध्ये 76 धावांची इनिंग खेळली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com