Asia Cup 2023 स्पर्धेची आतुरता शिगेला! पाहा कसे आहेत भारतासह सर्व सहा संघ

Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सामील होणारे सर्व सहा संघ सज्ज आहेत.
India vs Pakistan | Asia Cup 2023
India vs Pakistan | Asia Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023 all Squad :

बुधवारपासून (30 ऑगस्ट) आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. तसेच या स्पर्धेतील सामने पाकिस्तान आणि श्रीलंका देशात खेळवले जाणार आहेत.

वनडे स्वरुपात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत 30 ऑगस्टला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात मुलतानला खेळवला जाणार आहे. तसेच अंतिम सामना कोलंबोला 17 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे सहा संघ सामील होणार आहेत. या सहा संघात साखळी फेरी आधी खेळवण्यात येईल. साखळी फेरीसाठी सहा संघांचे तीन-तीनच्या दोन गटात विभाजन करण्यात आले आहे.

India vs Pakistan | Asia Cup 2023
Asia Cup 2023: बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना होऊ शकतो रद्द, कारण...

भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे तीन संघ अ गटात आहेत, तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ ब गटात आहेत. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करणार आहेत. सुपर फोर फेरीतील अव्वल दोन अंतिम सामना खेळतील.

या स्पर्धेसाठी सर्व सहा संघांची घोषणा झाली असून आता आशियाई चॅम्पियन बनण्यासाठी संघांची तयारी सुरु झाली आहे.

असे आहेत सर्व सहा संघ

  • भारतीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

    राखीव खेळाडू - संजू सॅमसन

  • पाकिस्तान संघ - अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हॅरीस, शादाब खान (उपकर्णधार) , मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकिल.

    राखीव खेळाडू - तय्यब ताहिर

  • अफगाणिस्तान संघ - हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, राशिद खान, गुलबदिन नायब, करिम जनत, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, सुलेमान साफी, फजलहक फारुकी

India vs Pakistan | Asia Cup 2023
Hockey 5s Asia Cup: भारतीय महिला संघाने जिंकला आशिया कप, वर्ल्डकपचं तिकिटंही केलं पक्कं
  • नेपाळचा संघ - रोहित पाउडेल (कर्णधार), कुशाल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), भीम शारकी, कुशाल माला, आरिफ शेख, दीपेद्र सिंग ऐरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतिश जीसी, श्याम धाकल, संदीप जोरा, किशोर महतो आणि अर्जू सौद.

  • बांगलादेश संघ - शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन ध्रुबो, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक महेदी हसन, नईम शेख, शमीम हुसेन, तनजीद हसन तमीम, तनझिम हसन साकिब

  • श्रीलंका संघ - दसून शनका (कर्णधार), पाथम निसंका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जनिथ परेरा, कुशल मेंडिस (उपकर्णधार),चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा,सदिरा समरविक्रमा, महिश तिक्षणा, दुनिथ वेलालागे, मथिशा पाथिराना, कसून रजिता, दुशन हेमंता, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com