Asia Cup 2022: शेन वॉटसनने केली विराटसाठी भविष्यवाणी, कोहली धमाकेदार कामगिरी करेल, कारण...

आशिया कपमधून विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करत आहे. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर तो भारताकडून शेवटचा खेळला होता.
Shane Watson Comnet on Virat Kohli
Shane Watson Comnet on Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Shane Watson Comment on Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने होईल आणि आगामी आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत पुन्हा सर्वोत्तम कामगिरी करेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने व्यक्त केला आहे.

आशिया कपमधून विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करत आहे. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर तो भारताकडून शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

Shane Watson Comnet on Virat Kohli
Asia Cup 2022 पूर्वी टीकाकारांवर संतापला विराट, 'मी चांगली फलंदाजी करतोय...'

उल्लेखनीय म्हणजे, नोव्हेंबर 2019 पासून कोहलीने एकही शतक झळकावलेले नाही. दुसरीकडे, जर तो 28 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळला, तर त्याच्याकडून संघासह क्रिकेटप्रेमिंनाही त्याच्याकडून चांगल्या कामगीरीची अपेक्षा असेल. पाकिस्तान क्रिकेट जगतातील भारताचा 'सर्वात मोठा प्रतिस्पर्धी' असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर हा होणारा सामना कोहलीचा 100 वा टी-20 सामना असेल.

Shane Watson Comnet on Virat Kohli
Asia Cup 2022 पूर्वी वसीम अक्रमने सांगितली पाक संघाची कमजोरी

शेन वॉटसनने आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये सांगितले की, "या महिन्यात क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर, कोहली या आशिया चषकात अधिक चांगली कामगिरी करेल, कारण ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक लवकरच होणार आहे." कोहलीने या वर्षात भारतासाठी फक्त 16 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार टी-20 सामने होते. या ब्रेकमुळे त्याला मानसिक, शारीरिकदृष्ट्या मजबूत होण्यास नक्कीच मदत झाली असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com