Asia Cup 2022 पूर्वी वसीम अक्रमने सांगितली पाक संघाची कमजोरी

Wasim Akram: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आशिया चषक टी-20 सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Wasim Akram
Wasim AkramDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आशिया चषक टी-20 सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना हा फक्त एक क्रिकेट सामना म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे. आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी विजेतेपदाचे दावेदार भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येतील. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच अक्रमने पाकिस्तानची कमजोरी उघड केली आहे.

दरम्यान, अक्रमने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढला होता. तो पुढे म्हणाला, “गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात भारताला (India) पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा (Pakistan) उत्साह वाढला होता. हा युवा संघ असून सातत्याने शानदार कामगिरी करत आहेत. इफ्तिखार अहमद याच्याशिवाय इतर कुणालाही अनुभव नसताना मधली फळी ही कमकुवत दुवा ठरु शकते. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकण्याची गुरुकिल्ली असेल. आशिया चषक स्पर्धेतील दोन्ही संघांसाठी हा सर्वात महत्त्वाचा सामना आहे.''

Wasim Akram
Asia Cup 2022: राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, आशिया चषकापूर्वी भारताला मोठा धक्का

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे बाहेर पडल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसल्याचे त्याने कबूल केले. तो पुढे म्हणाला, “शाहीनची पाकिस्तानला खूप उणीव भासेल कारण तो नव्या चेंडूवर विकेट घेण्यात माहीर आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करत असून जगातील पहिल्या तीन वेगवान गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. परंतु त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो बरा होण्यास वेळ लागेल.''

तसेच, शास्त्री यांनीही त्याच्याशी सहमती दर्शवत म्हटले की, “भारताला नेहमीच डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी त्रास दिला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज खूप महत्वाचे आहेत. कारण ते 2-3 षटकात खेळ फिरवू शकतात. जसे 1992 च्या विश्वचषक फायनलमध्ये वसीम अक्रमने केले होते.''

Wasim Akram
Asia Cup 2022: श्रीलंकेने अखेर संघाची केली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

शिवाय, आशिया कप T20 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल अक्रम म्हणाला, "सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. कारण चाहत्यांना या दोन संघांना एकत्र खेळताना पाहण्याची सवय नाही, त्यामुळे ते या सामन्याची वाट पाहत आहेत. मी दोन्ही देशांच्या क्रिकेटप्रेमींना विनंती करु इच्छितो की, याला फक्त एक क्रिकेट सामना म्हणून घ्यावा, ज्यामध्ये एक संघ हरेल आणि एक जिंकेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com