2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाला आशिया कप-2022 च्या अंतिम फेरीतही पोहोचता आले नाही. भारतीय संघ मोठ्या स्पर्धांमध्ये सतत फ्लॉप होत आहे, त्यामुळे संघावर चहूबाजूंनी टीका होत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून करण्यात येत असलेल्या प्रयोगांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दरम्यान त्यांनी एक मुलाखत दिली आहे.
राहुल द्रविड म्हणाले की, 'त्याची भूमिका फक्त कर्णधार आणि संघाला पाठिंबा देण्याची आहे. खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी संघासाठी बाहेर काढण्याचे आमचे ध्येय आहे. पण जेव्हा खेळाडू मैदानात असतात तेव्हा त्या वेळी कोणतीही योजना राबविण्याची जबाबदारी कर्णधार आणि खेळाडूंची असते. रोहित शर्मा हा शांत आणि संयमी कर्णधार आहे, त्यामुळे संघातील वातावरणही चांगले आहे. आम्ही पहिले दोन सामने जिंकले, आणि दोन सामने हरलो यावरून आमचा संघ चांगला किंवा वाईट ठरत नाही. संघातील वातावरण खूप चांगले आहे, अशा परिस्थितीत आम्हाला सर्व नियोजन उत्तमरीत्या पार पडणार अशी आम्हाला आशा आहे. हा एक प्रवास आहे ज्यासाठी आपण सर्वजण निघालो आहोत.'
दरम्या, टीम इंडियाला आशिया चषकाचे पहिले दोनच सामने जिंकता आले होते, त्यानंतर टीम इंडियाला सुपर-4 स्टेजवर लागोपाठ दोन सामने हरली. सरतेशेवटी भारताने अफगाणिस्तानला हरवून आशिया चषकाला निरोप दिला. मात्र, भारत आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्यामुळे अनेकांची निराशा झाली होती.
द्रविडच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाने अनेक प्रयोग केले, अनेक मालिकांमध्ये वरिष्ठांना विश्रांती देण्यात आली. वेगवेगळ्या मालिकांमध्ये कर्णधारही बदलण्यात आले आहेत, टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत. मात्र, या रणनीतीवरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राहुल द्रविडचे प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाने घरच्या बहुतांश मालिका जिंकल्या. तर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेतील मालिका गमावली, तसेच इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामनाही गमावला. मात्र, भारताने टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.