Asia Cup 2022: फायनलपूर्वी पाकिस्तान-श्रीलंकेचा सामना, कुणाचे पारडे जड

Asia Cup 2022: फायनलपूर्वी पाकिस्तान-श्रीलंकेचा सामना, कुणाचे पारडे जड
Published on
Updated on

आशिया कपमधील (Asia Cup) अफगाणिस्तान आणि भारत (Afghanistan And India) यांचे आव्हान संपृष्टात आले आहे. दोन्ही संघात गुरूवारी अखेरचा सामना खेळला गेला, तो भारताने 101 धावांनी जिंकला. आता सुपर फोरमधील अखेरचा सामना पाकिस्तान-श्रीलंका (Pakistan and Srilanka) या संघात आज (शुक्रवार) होत आहे. दोन्ही संघ फायनल खेळणार हे निश्चित आहे पण, त्यापूर्वी साखळी सामन्यातील एक शिल्लक सामना देखील आज खेळला जाणार आहे. फायनलपूर्वी दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.

पाकिस्तान संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. आशिया कपचे प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे पाहिले जात आहे. सुरवातीला भारताकडून सामना गमावल्यानंतर त्यांनी साखळी फेरीतील एकही सामना गमावला नाहीये. पाकिस्तानी फंलदाज आणि गोलंदाज आशिया कप जिंकण्यासाठी प्रत्येक सामन्यात आपला जीव पणाला लावून खेळताना दिसत आहेत. त्यामुळे पाकिस्तान आशिया कप जिंकणार असे क्रिकेट विश्वातील तज्ञ सांगत आहेत.

Asia Cup 2022: फायनलपूर्वी पाकिस्तान-श्रीलंकेचा सामना, कुणाचे पारडे जड
Sonali Phogat हत्येचा मुख्य सुत्रधार अन् हेतू अस्पष्टच; गोवा पोलिस

दुसरीकडे, श्रीलंका देखील जबरदस्त अंदाजमध्ये खेळताना दिसत आहे. श्रीलंकेत तरूण खेळाडूंची रेलचेल आहे, त्यामुळे अधिक एनर्जी आणि उत्साहाने सर्वच खेळाडू खेळताना दिसत आहेत. भारताविरोधातील सामना त्यांनी सहज जिंकून आशिया कपमधील आपले आव्हान त्यांनी जिंवत ठेवले. श्रीलंका सहजासहजी पाकिस्तान वजयी होऊ देईल अशी परिस्थिती अजिबात नाही. त्यामुळे दोन्ही तुल्यबळ संघ एमेकांसमोर उभे राहणार आहेत.

दरम्यान, आज होणारा सामना दोन्ही संघासाठी फायनल पूर्वी उत्तम सराव सामना ठरणार आहे. यामुळे अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघाना आपली रणनिती ठरविण्यासाठी महत्वाचे आहे.

Asia Cup 2022: फायनलपूर्वी पाकिस्तान-श्रीलंकेचा सामना, कुणाचे पारडे जड
Queen Elizabeth II यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com