Ashes 2023: लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग-11 ची घोषणा! मोईन अलीची जागा घेणार 'हा' खेळाडू

ऍशेस 2023 मालिकेतील लॉर्ड्सला होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
England Cricket Team
England Cricket TeamDainik Gomantak

Ashes 2023, Lords Test England Playing XI: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस 2023 मालिका सुरु आहे. या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 28 जूनपासून क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियवर खेळवला जात आहे.

या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या संघात इंग्लंडने मोठा बदल केला आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी जोश टंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्याला दुखापतग्रस्त मोईन अलीच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.

England Cricket Team
Ashes History: '...आणि इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू झाला', गोष्ट 141 वर्षांपूर्वीच्या 'त्या' पराभवाच्या बदल्याची

मोईन अलीच्या बोटाला एजबॅस्टनला झालेल्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो लॉर्ड्सला होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.

विशेष म्हणजे मोईन अलीने 2021 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण इंग्लंडच्या कसोटी संघातील प्रमुख फिरकीपटू जॅक लीच ऍशेस 2023 मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर झाला. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी अलीला कसोटी निवृत्तीतून माघार घेण्याची विनंती केली.

त्यानुसार अलीने पुन्हा जवळपास 2 वर्षांनी कसोटीत पुनरागमन केले. पण पुनरागमनाच्या सामन्यातच तो दुखापतग्रस्त झाला. दरम्यान, तो पुन्हा तिसऱ्या कसोटी सामन्यातून तंदुरुस्त होऊन पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

England Cricket Team
Ashes 2023: तब्बल 12 वर्षांनी कांगारुनी कसोटीत केला 'तो' विराट पराक्रम, कमिन्सशी आहे खास कनेक्शन

जोश टंगला संधी

मध्यमगती गोलंदाज असलेल्या 25 वर्षीय टंगने नुकतेच जूनच्या पहिल्या आठवड्यात आयर्लंड विरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातून इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत त्याच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवली होती.

दरम्यान आता टंगला संधी दिल्याने लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेन कर्णधार बेन स्टोक्ससह 5 वेगवान खेळताना दिसणार आहे. या वेगवान गोलंदाजांच्या फळीत टंग आणि स्टोक्सशिवाय ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन या गोलंदाजांचा समावेश आहे.

तसेच इंग्लंडच्या संघात बेन डकेट, जॅक क्रावली, ओली पोप, हॅरी ब्रुक, जो रुट यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल, तसेच त्यांच्या जोडीला यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो असणार आहे.

ऑस्ट्रेलिया आघाडीवर

सध्या पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ ऍशेस 2023 मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने एजबॅस्टनला झालेला रोमांचक कसोटी सामना 2 विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे आता लॉर्ड्स कसोटी जिंकून ही आघाडी वाढवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल, तर इंग्लंड मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल.

  • लॉर्ड्स कसोटीसाठी असा आहे इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - बेन डकेट, झॅक क्रावली, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन, जोश टंग, जेम्स अँडरसन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com