Ashes 2023: मिचेल मार्शनं शतक ठोकताच क्रिकेटर भावाचा अन् वडिलांचा जोरदार जल्लोष, पाहा Video

Ashes 2023: लीड्स कसोटीत मिचेल मार्शने शतक झळकावल्यानंतर त्याच्या भावाने आणि वडिलांनी जोरदार जल्लोष केला.
Marsh Family
Marsh FamilyDainik Gomantak
Published on
Updated on

Mitchell Marsh Century celebrated by Brother Shaun and Father Geoffrey : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून (6 जुलै) हेडिंग्ले, लीड्स येथे होत आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने इंग्लंडला शतकी दणका दिला.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीला उतरला. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठे धक्के देण्यात यश मिळवले होते. 85 धावांत ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्स गेल्या होत्या. यात डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन अशा फलंदाजांचा समावेश होता.

पण त्यानंतर मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करून दिले. त्याने ट्रेविस हेडला साथीला घेत आक्रमक फलंदाजी केली. या दोघांमध्ये 155 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान मार्शने दमदार शतक केले. त्याने 102 चेंडूत त्याचे तिसरे शतक साजरे केले. दरम्यान, त्याने हे शतक केले, त्यावेळी त्याच्या कुटुंबात मात्र जोरदार जल्लोष झाला.

Marsh Family
Ashes 2023: 'याचसाठी तू आठवणीत राहशील...' बेअरस्टोच्या विकेटवर चिडलेल्या ब्रॉडनं लाईव्ह सामन्यात कॅरेला सुनावलं

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मार्शने शतक करताच त्याचा मोठा भाऊ शॉन आणि वडिल जॉफ्री मार्श जोरदार जल्लोष करताना दिसत आहेत. या सेलिब्रेशनबद्दल पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मिचेल मार्शला या व्हिडिओबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, त्याने हा व्हिडिओ पाहिला.

सध्या त्याचे कुटुंबिय शॉनचा दोन दिवसांनी (9 जुलै) 40 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बालीला गेले आहेत. आता त्याने शतक केल्याने शॉनचा 40 वा वाढदिवसही खास ठरेल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मिचेल मार्शचा मोठा भाऊ शॉन आणि वडील जॉफ्री हे देखील ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळले असून त्यांनीही त्याच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी केली आहे.

तसेच मिचेल आणि शॉन या भावांबरोबरच त्यांच्या वडिलांच्या नावावरही ऍशेसमध्ये शतक करण्याचा विक्रम आहे. शॉनने ऑस्ट्रेलियाकडून 38 कसोटी, 73 वनडे आणि 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तसेच जॉफ्री यांनी ऑस्ट्रेलियाकडून 50 कसोटी आणि 117 वनडे सामने खेळले आहेत.

Marsh Family
Ashes 2023: तब्बल 6037 दिवसांनी ऍशेसमध्ये 'असं' घडलंय! दोन दिग्गजांविना उतरले इंग्लंड-ऑस्ट्रेलिया

दरम्यान, मिचेल मार्श शतक केल्यानंतर 118 चेंडूत 118 धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र, ऑस्ट्रेलियाची खालची फळी गडगडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 60.4 षटकात 263 धावांवर संपुष्टात आला. पण नंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीही शानदार कामगिरी करताना इंग्लंडला संकटात टाकले आहे.

इंग्लंडने 45 षटकांच्या आतच 200 धावांचा टप्पा गाठण्यापूर्वीच 8 विकेट्स गमावल्या आहेत. दरम्यान, मार्शने गोलंदाजीतही योगदान देताना झॅक क्रॉलीची विकेट मिळवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com