Ashes 2023: लीड्स कसोटीतही वाद पेटला! स्मिथ अन् बेअरस्टोमध्ये गरमा-गरमी; Video व्हायरल

Ashes 2023: लीड्सला चालू असलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटीत स्मिथ आणि बेअरस्टोमध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली.
Steve Smith | Jonny Bairstow
Steve Smith | Jonny BairstowDainik Gomantak
Published on
Updated on

Steve Smith angry after Jonny Bairstow sledged him: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (6 जुलै) सुरू झाला आहे. हा सामना सध्या रोमांचक वळणावर आहे. दरम्यान, या सामन्यातही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसले आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.

झाले असे की लीड्सला सुरु असलेल्या या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात स्मिथ 2 धावा करूनच बाद झाला. त्यानंतर स्मिथ आणि बेअरस्टो यांच्यात वाद पाहायला मिळाले. त्यांच्यातील शाब्दिक चकमकीवेळीचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला.

Steve Smith | Jonny Bairstow
Lords Ashes Test: वाद संपता संपेना! लॉर्ड्सवर ख्वाजा-वॉर्नर MCC सदस्यांशी भिडले, तिघांचं निलंबन

झाले असे की ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या 28 व्या षटकात स्मिथने मोईन अलीविरुद्ध फ्लिक शॉट मारला. त्यामुळे त्याचा सोपा झेल शॉर्ट मिड-विकेटला बेन डकेटने पकडला. तो बाद झाल्याने खूप निराश झाला होता. याचवेळी इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो त्याला 'पुन्हा भेटू स्मज' (See ya Smudge) असे म्हटले. स्मज स्मिथचे टोपननाव आहे.

दरम्यान, बेअरस्टोचा आवाज ऐकून स्मिथ मागे फिरला आणि त्याने म्हटले 'मित्रा हे काय आहे?' त्यावर बेअरस्टो त्याला म्हणाला, 'मी म्हणालो, चिअर्स, नंतर भेटू.' यानंतर स्मिथने हे वाद पुढे वाढवला नाही आणि तो मैदानातून बाहेर गेला.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की स्मिथसाठी लीड्स कसोटी खास आहे, कारण हा त्याचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी 100 कसोटी खेळणारा 15 वा खेळाडू ठरला आहे. पण स्मिथ त्याच्या 100 व्या कसोटीत खास काही करू शकलेला नाही. तो पहिल्या डावात 22 धावांवर आणि दुसऱ्या डावात 2 धावांवर बाद झाला.

Steve Smith | Jonny Bairstow
Ashes 2023: मिचेल मार्शनं शतक ठोकताच क्रिकेटर भावाचा अन् वडिलांचा जोरदार जल्लोष, पाहा Video

बेअरस्टोची विकेट ठरलेली वादग्रस्त

ऍशेस 2023 स्पर्धेतील लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून 52 वे षटक टाकणाऱ्या कॅमेरॉन ग्रीनने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. तो चेंडू बेअरस्टोने सोडून दिला. त्यामुळे चेंडू मागे यष्टीरक्षण करणाऱ्या ऍलेक्स कॅरेकडे गेला. पण चेंडू कॅरेकडे गेला तेव्हा बेअरस्टोने फक्त पाय खाली घासला आणि तो पुढे निघून गेला.

त्यावेळी त्याने मागे चेंडू पूर्ण झाला की नाही हे पाहिले नाही. याचा फायदा उचलत कॅरेने चेंडूवर स्टंपवर फेकला. त्यामुळे बेअरस्टोला पंचाकडून 10 धावांवर असताना नियमानुसार बाद देण्यात आले. 

पण या विकेटबद्दल आणि खिलाडूवृत्तीबद्दल बरीच चर्चा क्रिकेटविश्वात झाली होती. याशिवाय या विकेटबद्दल इंग्लंड संघाने आणि बेअरस्टोनेही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मात्र, या दोन्ही संघात वादाची ठिणगी पडल्याचेही दिसले.

सामना रोमांचक स्थितीत

लीड्स कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 60.4 षटकात 263 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 52.3 षटकात सर्वबाद 237 धावांवर संपुष्टात आला.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 26 धावांची आघाडी मिळाली. दरम्यान दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 47 षटकात 4 बाद 116 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलिया 142 धावांनी आघाडीवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com