Anushka Sharma सह बॉलिवूडचा विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव; पाहा कोण काय म्हणाले

विराट कोहलीने नाबाद 83 धावांचे योगदान देत, संघासाठी विजय खेचून आणला.
Virat Kohli And Anushka Sharma
Virat Kohli And Anushka Sharma Dainik gomantak
Published on
Updated on

भारत पाकिस्तान दरम्यान झालेला आजचा सामना अनेक कारणानं ऐतिहासिक ठरला. भारताने चार गडी राखून पाकिस्तान विरोधात विजय मिळवला आहे. अखेरच्या षटकापर्यंत चालेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या स्फोटक खेळाचं कौतुक होत आहे. विराट कोहलीने नाबाद 83 धावांचे योगदान देत, संघासाठी विजय खेचून आणला. विराटच्या या खेळीसाठी पत्नी अनुष्का शर्माने खास मेसेज लिहला आहे. याशिवाय अनेक बालिबूड कलाकारांनी विराटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Virat Kohli And Anushka Sharma
IN Pictures: भारतीय संघाचा विजयी जल्लोष; पाहा सामन्यातील खास फोटो

अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर तिच्या भावना व्यक्त करणारी भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. विराट तुझ्या खेळीनं साऱ्या देशाला खूप आनंद झाला आहे. कोट्यवधी लोकांना आज तू दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. तुझा खेळ, त्यातील मेहनत, एकाग्रता हे सारं आम्हाला प्रभावित करणारं होतं. म्हणून मला तू नेहमीच लिमिटलेस वाटत आला आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सामना होता. आपली आई घरात एवढ्या आनंदात का नाचते आहे? हे छोट्या जीवाला अजुन कळालं नसेल? मला तुझा खूप गर्व आहे. तुझे मनपूर्वक अभिनंदन. असे अनुष्का शर्माने लिहलं आहे.

Virat Kohli And Anushka Sharma
Ind vs Pak T20 World Cup: टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट; थरारक सामन्यात पाकिस्तानवर शेवटच्या चेंडुवर मात

अनुष्का शर्माच्या या पोस्टवर विराट कोहलीने प्रतिक्रिया देत तिचे आभार मानले आहेत. आयुष्याच्या चढ उतारात सोबत केल्याबद्दल त्याने अनुष्काचे आभार मानले आहेत. गायक हार्डी संधुने विराट कोहली नेहमीच किंग राहील असे म्हटले आहे. तर, अभिनेत्री विद्या बालनने विराटने दिवाळीचे मोठे गिफ्ट दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच, सुनिल शेट्टी, कार्तिक आर्यन, सोनाली बेंद्रे, मौनी रॉय, करिश्मा कपूर, आर. माधवन यांनी देखील अनुष्काच्या या पोस्टवर कमेन्ट करत विराटचे तोंडभरून कौतुक केले आहे.

महाराष्ट्रातील राजकाण्यांनी दिल्या प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील अनेक राजकारणी यांनी भारताच्या या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली असून, संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, रोहीत पवार यांच्यासह अनेकांनी संघाला शुभेच्छा देत विराटचे कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com