भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या T20 विश्वचषकातील चित्तथरारक सामन्यात आज भारताने चार गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहली आणि हार्दिक पंड्या या विजयाचे शिल्पकार ठरले. कोहलीच्या नाबाद 83 धावा पाकिस्तान विरोधात विजयासाठी निर्णायक ठरल्या. विशेष म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याची उत्सुकता ताणली गेली. अखेर अखेरच्या चेंडूवर भारतीय संघाला विजय मिळवता आला.
पाकिस्तानने प्रथम फंलदाजी करताना भारताला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले.
भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली, सलामीचे फंलदाज बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने भारतीय डाव सावरला.
अखेरच्या षटकात भारतीय संघाला 16 धावांची आवश्यकता होती. भारतीय संघ विजयाच्या जवळ असताना पंड्या आऊट झाला आणि त्याजागी आश्विन आला. आश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत भारतला विजयी केले.
या सामन्यात कोहलीने केलेल्या नाबाद 83 धावा तसेच, शेवटच्या तीन षटकात केलेली आक्रमक खेळी यामुळे भारताला विजयाचे जवळ जाता आले. त्यामुळे विराटच्या या विराट खेळी सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, या चित्तथरारक सामन्यानंतर ICC ने आपल्या ट्विटर हँडलवरून विराट कोहलीचा असा फोटो ट्विट केला आहे. त्याला किंग कोहली बॅक असे कॅप्शन दिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.