South Africa vs India, 1st Test at Centurion Weather and Pitch updates:
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला मंगळवारी (26 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनला खेळला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी सेंच्युरियनमध्ये सोमवारी पाऊस झाला आहे. त्यामुळे आता या सामन्यातही पावसाचा अडथळा येणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हा कसोटी सामना असल्याने 5 दिवस चालू शकतो. पण AccuWeather च्या रिपोर्ट्स नुसार या सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी म्हणजेच मंगळवारी आणि बुधवारी सेंच्युरियनमध्ये पावसाची दाट शक्यता आहे.
मंगळवारी 92 टक्के पावसाची शक्यता आहे, तर बुधवारी 90 टक्के पावसाची शक्यता आहे. यानंतर मात्र, गुरुवारी पावसाची अत्यंत कमी शक्यता आहे. परंतु, शुक्रवारी आणि शनिवारीही पाऊस अडथळा आणू शकतो.
मात्र, शुक्रवारी आणि शनिवारी पावसाची शक्यता असली, तरी काहीप्रमाणात तरी खेळ होण्याची शक्यता आहे. एकूणच सेंच्युरियनला होणाऱ्या सामन्यात पाऊस मोठा अडथळा ठरण्याचीच चिन्ह आहेत. तरी चाहत्यांना अपेक्षा असेल की वरुण राजाची कृपा होऊन सामना पाहायला मिळावा.
दक्षिण आफ्रिकेत बऱ्याचदा वेगवान गोलंदाजांना मदत करणारीच खेळपट्टी पाहायला मिळते. या सामन्यातही अशीच खेळपट्टी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. खेळपट्टीवर गवत असू शकते, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकेल. दोन्ही संघातही चांगले गोलंदाज असल्याने यांच्यातील प्रतिस्पर्धा पाहायला चाहत्यांना आवडू शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत 42 कसोटी सामने खेळवण्यात आले असून 15 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर 17 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. तसेच 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेत या दोन संघात 23 कसोटी सामने झाले असून 4 सामने भारताने जिंकलेत, तर 12 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामने अनिर्णत राहिले आहेत.
तसेच आत्तापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.