Team India Selectors: दिल्ली कॅपिटल्सबरोबरील मार्ग झाला वेगळा, आता 'हा' दिग्गज बनणार टीम इंडियाचा सिलेक्टर?

बीसीसीआयने भारतीय संघाच्या निवड समितीमधील रिक्त पद भरण्यासाठी अर्ज मागवले असून सध्या या पदासाठी एका दिग्गज खेळाडूचे नाव आघाडीवर आहे.
Gutam Gambhir | Ajit Agarkar
Gutam Gambhir | Ajit AgarkarDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Capitals part ways with Ajit Agarkar and Shane Watson: आयपीएलमधील संघ दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी (29 जून) मोठी घोषणा केली आहे. त्यांनी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अजित अगरकर आणि शेन वॉटसन यांच्याबरोबरचे मार्ग वेगळे केले आहे. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्ली कॅपिटल्सने माहिती दिली आहे.

आयपीएल 2022 पासून अगरकर आणि वॉटसन दिल्ली कॅपिटल्ससाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत होते. पण गेल्या दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. आयपीएल 2023 मध्ये तर संघ 9 व्या क्रमांकावर राहिला होता.

त्यानंतर आता या दोघांचा करार दिल्ली कॅपिटल्सबरोबर संपला आहे. याबद्दल माहिती देताना दिल्ली कॅपिटल्सने या दोघांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, या दोघांचा जरी करार संपला असला तरी दिल्ली कॅपिटल्स रिकी पाँटिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून आणि सौरव गांगुलीला क्रिकेट संचालक म्हणून कायम करण्याचीच दाट शक्यता आहे.

Gutam Gambhir | Ajit Agarkar
Ajit Agarkar ला 'बाँबे डक' म्हणतात तरी का?

अजित अगरकर बनू शकतो निवडकर्ता

दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अजित अगरकरने दिल्ली कॅपिटल्सबरोबरील करार संपवल्यानंतर आता भारतीय पुरुष संघाचा निवडकर्ता बनण्यासाठी तो प्रबळ दावेदार मानला जात आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वीच भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीमधील रिक्त पद भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी सध्या २००७ टी२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेल्या अगरकरचे नाव आघाडीवर आहे.

निवड समीतीमध्ये फेब्रुवारीपासून एक जागा रिक्त आहे. फेब्रुवारीमध्ये स्टिंग ऑपरेशननंतर निवड समीतीच्या अध्यक्षपदावरून चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिव सुंदर दास यांना निवड समीतीचे प्रभारी अध्यक्षपद देण्यात आले होते.

तसेच सध्या निवड समितीमध्ये शिव सुंदर दास यांच्याशिवाय सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ हे सदस्य आहेत. पण अद्याप एक जागा रिकामी असल्याने या जागेसाठी 30 जूनपर्यंत बीसीसीआयने अर्ज करण्यास सांगितले आहे. त्यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.

Gutam Gambhir | Ajit Agarkar
Team India Schedule: टीम इंडिया वेस्ट इंडिजनंतर अवध्या पाच दिवसात करणार 'या' देशाचा दौरा; वेळापत्रकाची घोषणा

दरम्यान अगरकरच्या आधी या पदासाठी विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग यांची नावेही चर्चेत आली होती.

अजित अगरकरची कारकिर्द

मुंबईच्या अजित अगरकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 कसोटी सामने खेळले असून 58 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने एका शतकासह 571 धावा केल्या आहेत. त्याने 191 वनडे सामने खेळताना 288 विकेट्स घेतल्या असून 3 अर्धशतकांसह 1269 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 3 विकेट्स घेतल्या आहेत.

तो एकूण कारकिर्दीत 110 प्रथम श्रेणी सामन खेळला असून 299 विकेट्स घेतल्या आहेत आणि 3336 धावा केल्या आहेत. तसेच 270 लिस्ट ए सामने खेळले असून 420 विकेट्स घेतल्या आहेत आणि 2275 धावा केल्या आहेत. त्याने 62 टी20 सामने खेळले असून 47 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com