दैनिक गोमन्तक डिजिटल
भारताचा माजी क्रिकेटपटू अजित अगरकर 4 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
अजितने भारताचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात प्रतिनिधित्व केले असून त्याच्या नावावर काही खास विक्रमही आहेत.
अजितने सुरुवातीला फलंदाज म्हणून कारकिर्द सुरू केली होती, पण नंतर तो अष्टपैलू खेळाडू म्हणून तयार झाला. त्यानेही सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीसारख्या खेळाडूंप्रमाणेच रमाकांत आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.
त्याला 'बाँबे डक' असेही नाव एका घटनेमुळे पडले होते. ती घटना म्हणजे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1999 ते 2001 दरम्यान सलग 7 वेळा कसोटीत शुन्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याला 'बाँबे डक' असे नाव पडले.
विक्रम
अजित हा वनडेमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने 23 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच तो वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय फलंदाजही आहे. त्याने 21 चेंडूत झिम्बाब्वे विरुद्ध 2000 साली अर्धशतक पूर्ण केले होते.
अजितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 221 सामने खेळताना 349 विकेट्स घेतल्या आहेत आणि 1855 धावा केल्या आहेत.