न्यूझीलंडनंतर आता इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह, PCBचे मोठे नुकसान

इंग्लंडही (England) ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात (Pakistan) येणार आहे, पण आता ते ही येईतील की नाही याबाबत देखील शंका निर्माण झाली आहे.
न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण (Reason for safety) देत दौरा रद्द केला, त्यानंतर आता इंग्लंडच्या पाक दौऱ्याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण (Reason for safety) देत दौरा रद्द केला, त्यानंतर आता इंग्लंडच्या पाक दौऱ्याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

कालचा दिवस पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी (PCB) अत्यंत वाईट दिवस होता. या दिवशी दौऱ्याची सुरुवात करताना न्यूझीलंड (New Zealand) संघ पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पहिला एकदिवसीय सामना खेळणार होता. सामन्याच्या काही तास आधी न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण (Reason for safety) देत दौरा रद्द केला. या संपूर्ण घटनेमुळे पाकिस्तानची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. तसेच त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यामुळे पाकिस्तान बोर्डाला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.

न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण (Reason for safety) देत दौरा रद्द केला, त्यानंतर आता इंग्लंडच्या पाक दौऱ्याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सामन्याच्या काही तास आधी सुरक्षेच्या कारणावरुन न्यूझीलंडचा पाक दौरा स्थगित

न्यूझीलंड विरुध्द पाकिस्तान यांच्यात रावळपिंडी येथे 3 वनडे आणि नंतर लाहोरमध्ये 5 टी -20 सामने खेळण्यात येणार होते. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला सांगितले की, पाकिस्तान सरकार, पीसीबी आणि सुरक्षा संस्था देशात क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. न्यूझीलंड दौरा रद्द होणे हे त्यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का मानले जात आहे.

न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण (Reason for safety) देत दौरा रद्द केला, त्यानंतर आता इंग्लंडच्या पाक दौऱ्याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
IPLला टशन देण्यासाठी पाकिस्तानने केले न्यूझीलंडसोबतच्या मालिकेचे आयोजन

पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही न्यूझीलंडबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) तक्रारही केली होती, पण आम्हाला तिथूनही कोणतीही मदत मिळाली नाही. आयसीसीमध्ये भारताचे वर्चस्व खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत तिथून मदत मिळण्याची आशा नाही. याचा पुढील मालिकेवरही पूर्ण परिणाम होईल. इंग्लंडही ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात येणार आहे, पण आता ते ही येईतील की नाही याबाबत देखील शंका निर्माण झाली आहे.

अलीकडेच इंग्लंडचे (England) माजी कर्णधार मायकल वॉन यांनीही पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न एका ट्विटद्वारे उपस्थित केला आहे. मायकेल वॉनने लिहिले, पाकिस्तानसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सामन्यापूर्वी म्हणजे शेवटच्या क्षणी असा दौरा रद्द करण्याच्या निर्णयामुळे खेळाचे मोठे नुकसान होत आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यासाठी सुरक्षेचे प्रश्न सुटतील अशी आशा आहे. वॉन व्यतिरिक्त, वेस्ट इंडिजचा टी -20 विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीसह इतर अनेक क्रिकेटपटूंनी पाकिस्तानात सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com