टीम इंडिया सोडताच रवी शास्त्री सांभाळणार 'या' फ्रँचायझीची जबाबदारी!

T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) नंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि त्यांचे सहकारी भरत अरुण (Bharat Arun) आणि आर. श्रीधर (R. Sridhar) च्या भारतीय संघ सोडणार आहेत.
Ravi Shastri
Ravi ShastriDainik Gomantak

T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) नंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि त्यांचे सहकारी भरत अरुण (Bharat Arun) आणि आर श्रीधर (R. Sridhar) च्या भारतीय संघ सोडणार आहेत. या स्पर्धेनंतर त्यांचा करार संपणार असून आता त्यांनाही टीम इंडियासोबत (Indian Cricket Team) राहायचे नाही. रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी आयपीएल संघात सहभागी होऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे. अलीकडेच त्यांचे नाव अहमदाबाद या आयपीएल संघाशी जोडले जात आहे. Cricbuzz ने वृत्त दिले आहे की, अहमदाबाद फ्रँचायझी मालक CVC Capitals UAE मध्ये रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर. श्रीधर यांच्याशी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर असही म्हटलं जात की, अद्याप याबद्दल कोणतीही पुष्टी नाही कारण शास्त्री यांनी 2021 टी-20 विश्वचषक पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. सध्या रवी शास्त्री हे भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत, तर भरत अरुण गोलंदाजी आणि श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे.

यापूर्वी देखील असं म्हटलं जात होतं की, टीम इंडियापासून वेगळे झाल्यानंतर रवी शास्त्री पुन्हा कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. क्रिकेट सोडल्यानंतर ते समालोचन क्षेत्रामध्ये सक्रिय होतील, आणि यामध्येही आपली छाप पाडतील. 20 वर्षे ते या क्षेत्रात सक्रिय होते. पण 2014 पासून एक वर्ष वगळता ते टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहेत. रवी शास्त्री 2016 मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. यानंतर समालोचन सोडावे लागले. आता रवी शास्त्री समालोचनाऐवजी आयपीएलमध्ये कोचिंग करतील, असही बोललं जात आहे. तथापि, रवी शास्त्री आणि अहमदाबाद फ्रँचायझी (Ahmedabad Franchise) यांच्याबाबतीत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ravi Shastri
न्यूझीलंडला अफगाणिस्तानने पराभूत करु दे रे देवा ! 'काळजी करु नका': रशिद खान

अनेक ब्रॉडकास्टर्स शास्त्री यांच्याशी संपर्क साधला

आयपीएलमध्ये कोचिंगची जबाबदारी सांभाळताना रवी शास्त्री समालोचनाचे कामही करु शकतात. सध्या व्हीव्हीएस लक्ष्मणही (VVS Laxman) त्याच पद्धतीने सक्रिय आहे. तो सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक असून स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचनही करतो. अनेक ब्रॉडकास्टर्संनी रवी शास्त्री यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. यामध्ये स्टारसोबत सोनीचेही नाव आहे.

Ravi Shastri
'आम्ही टीम इंडियाला नक्की पराभूत करु': बाबर आझम

सीव्हीसी कॅपिटल्सने अहमदाबाद फ्रँचायझचे नाव 5600 कोटी रुपयांमध्ये आपल्या नावे केले होते. या फर्मचे जगातील इतर अनेक क्रीडा लीगमधील संघ आहेत. अहमदाबाद फ्रँचायझी मेगा लिलावापूर्वी संघ तयार करण्यासाठी सर्व तयारी करत आहे. यासाठी त्यांना लवकरात लवकर सपोर्ट स्टाफची निवड करायची आहे जेणेकरुन खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत निर्णय घेता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com