टीम इंडिया (India) आणि पाकिस्तान (Pakistan) टी -20 विश्वचषकात (T20 World Cup) आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळणार आहे. सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टीम इंडियाला पराभूत करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून (IND vs PAK T20) अजून हरलेली नाही. यावर बाबर आझम म्हणाले, काय झाले ते आम्हाला आठवत नाही. जेव्हा तुम्ही मोठी स्पर्धा खेळता, तेव्हा तुमचा आणि तुमच्या संघाचा तुमच्यावर किती विश्वास आहे, हे महत्त्वाचे असते. मला वाटते की एक संघ म्हणून आमचा आत्मविश्वास खूप चांगला आहे. जे मागे घडून गेले त्याचा आपण विचार करत नाही, पुढे काय येत आहे याचा विचार करतो. आम्ही देखील अशीच तयारी करत आहोत. मला खात्री आहे की आम्ही तयार आहोत. सामन्याच्या दिवशी आम्ही चांगले क्रिकेट खेळू असा विश्वास देखील त्याने व्यक्त केला.
टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याची रणनीती बनवताना पाकिस्तानी कर्णधार बाबर म्हणाला, भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच हाय-व्होल्टेज सामना असतो. यावेळी दोन्ही संघावर दबावही तेवढाच असतो. एक खेळाडू आणि एक संघ म्हणून, आमचा प्रयत्न आहे की आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आपण खेळावर जितके जास्त लक्ष केंद्रित करू तितके आपल्यासाठी चांगले होईल. सामन्यात प्रत्येकालाच चांगले काम करावे लागेल.
तो म्हणाला, तुम्ही मनापासून नियोजन करू शकता. क्रिकेट सर्वत्र सारखेच आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दबाव आपण तो कसे हाताळाल? याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
पाकिस्तान हा सामना जिंकेल
यूएईमध्ये खेळण्याच्या अनुभवावर बाबर आझम म्हणाला, आम्ही यूएईमध्ये 3 ते 4 वर्षे क्रिकेट खेळलो आहे. येथील परिस्थितीबद्दल आम्हाला अधिक माहिती आहे. या परिस्थितीत गोलंदाजी आणि फलंदाजी कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. मात्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सामन्याच्या दिवशी चांगले क्रिकेट खेळावे लागेल. जो संघ त्या दिवशी सर्वोत्तम क्रिकेट खेळेल तो जिंकेल. जर तुम्ही मला विचारले तर मी फक्त एवढेच म्हणेन की आम्ही जिंकू असे त्याने स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.