लवकरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांना एक अत्यंत दुर्मिळ दृश्य पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि पाकिस्तान क्रिकेटचे (Pakistan national cricket team) अव्वल खेळाडू एकाच संघाकडून खेळताना दिसणार आहेत. (ACC will give IND PAK fans a surprise Babar Azam and Virat Kohli will be seen together)
याआधी शेवटी 2007 खेळला गेलेला आफ्रो-आशियाई चषकाला आशियाई क्रिकेट परिषद (ACC) येणाऱ्या वर्षी 2023 मध्ये पुनरुज्जीवित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. म्हणजेच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवानसोबत (Mohammad Rizwan) ड्रेसिंग रूम शेअर करू शकतात.
भारत आणि पाकिस्तान यांनी शेवटचा 2012 मध्ये द्विपक्षीय स्पर्धेत भाग घेतला होता, त्या स्पर्धेचे आयोजन भारताने केले होते. दोन्ही देशांमधील वाढत्या राजकीय तणावामुळे संघांनी द्विपक्षीय मालिकेत एकमेकांविरुद्ध खेळणे थांबवले होते. जरी ते एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक आणि आशिया कप यासारख्या आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळत असले तरी ही.
2021 टी-20 विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सामन्यात दोन्ही संघांची शेवटची भेट 24 ऑक्टोबर रोजी झाली होती तर दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारतावर 10 गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदवला होता.
आफ्रो-आशियाई चषक इतिहासात 2005 आणि 2007 मध्ये दोनदा आयोजित करण्यात आला. पहिल्या टूर्नामेंटमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली, तसेच दुसऱ्या स्पर्धेत एक टी-20 सामनाही खेळला जाणार आहे.
ACC या स्पर्धेचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली जात आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर, 2023 मध्ये, भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आशिया इलेव्हनमध्ये खेळताना दिसणार आहेत, ज्यामध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे खेळाडू देखील असतील.
ACC चे कमर्शियल आणि इव्हेंट्सचे प्रमुख प्रभाकरन थनराज यांनी फोर्ब्सला सांगितले की, "आम्हाला अद्याप बोर्डांकडून पुष्टी मिळाली नाही. ते पुढे म्हणाले की, "परंतु आशियाई इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधील सर्वोत्तम खेळाडू घेण्याची आमची योजना आहे. त्यांनी जोर देत सांगितले की, "तो एक मोठा कार्यक्रम असणार आहे. खरोखर, खूप मोठा."
मुख्य कार्यकारी समितीवरील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेले दामोदर म्हणाले की, "खेळाडूंना एकत्र खेळताना मला पाहायला आवडेल. मला खात्री आहे की खेळाडूंना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. "आणि भारतातील खेळाडूंना एकाच संघात खेळताना पाहणे ही एक सुंदर गोष्ट असणार आहे."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.