Abhishek Sharma
Abhishek SharmaDainik Gomantak

Abhishek Sharma: अभिषेक शर्माचा 'नो कॉम्प्रमाईज' फॉर्म्युला, म्हणाला "खेळण्याची पद्धत बदलणार नाही!"

Abhishek Sharma Message: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे.
Published on

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या अपयशानंतर त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अभिषेकने आपल्या टीकाकारांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. "मला फरक पडत नाही," असे म्हणत त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

"दोन वर्षांपूर्वीच चिंता करणे सोडले": अभिषेकची स्पष्टोक्ती

एका नुकत्याच समोर आलेल्या मुलाखतीत अभिषेक शर्माने आपल्या मानसिकतेबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, "यश मिळो किंवा न मिळो, मी माझ्या खेळण्याची पद्धत बदलणार नाही. मी केवळ माझ्या फलंदाजीचा आनंद घेतो. दोन वर्षांपूर्वीच मी निकालाची चिंता करणे सोडून दिले आहे, कारण मला कळून चुकले आहे की केवळ सराव आणि कठोर परिश्रम माझ्या हातात आहेत. माझ्यावर कोणताही दबाव नाही, कारण मी माझ्या नैसर्गिक खेळावर लक्ष केंद्रित करत आहे." अभिषेकच्या या विधानावरून हे स्पष्ट होते की, तो आफ्रिकन गोलंदाजांविरुद्धही पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेणार आहे.

Abhishek Sharma
Goa Drowning Death: मौजमजा बेतली जीवावर! पोळे बीचवर कर्नाटकातील 19 वर्षांचा तरुण बुडाला, शोध सुरू

कर्णधार सूर्यकुमार यादवची भक्कम साथ

अभिषेकच्या खराब फॉर्ममुळे संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. संजूने नेट्समध्ये तासन् तास सराव केल्याने बदलाचे संकेत मिळत होते. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सूर्या म्हणाला, "जे लोक अभिषेकच्या फॉर्मबद्दल काळजीत आहेत, मला त्यांचीच काळजी वाटतेय. अभिषेक जेव्हा रंगात येतो तेव्हा काय होते, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. गेल्या वर्षभरात त्याने आपल्याला अनेकदा कठीण प्रसंगातून बाहेर काढले आहे, आता त्याला साथ देण्याची आमची पाळी आहे."

Abhishek Sharma
Goa Voter List Update: 1,27,468 मतदार 'आऊट', वगळलेल्‍या मतदारांमध्‍ये मुरगाव आघाडीवर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 'करो या मरो'ची स्थिती

अभिषेक शर्माच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी अग्निपरीक्षा मानली जात आहे. सलग तीन 'डक'नंतर तो मैदानात उतरणार आहे. के. श्रीकांत यांसारख्या दिग्गजांनी त्याला थोडा वेळ घेण्याचा सल्ला दिला असला, तरी अभिषेकने आपल्या 'ताबडतोड' अंदाजातच खेळण्याचा निर्धार केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर अभिषेकची ही 'निर्भय' वृत्ती भारताला चांगली सुरुवात करून देते की पुन्हा एकदा संकटात टाकते, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com