Rohit Sharma: '...तर बॅटिंग करु शकत नाही', रोहित रिटायर्ड हर्ट की आऊट चर्चेत डिविलियर्सचीही उडी

India vs Afghanistan: अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये रोहित रिटायर्ड हर्ट की रिटायर्ड आऊट झाला होता, यावर बरीच चर्चा झाली, आता यावर एबी डिविलियर्सनेही प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma - AB de Villiers
Rohit Sharma - AB de VilliersPTI and X/ICC

AB de Villiers reacted on whether Rohit Sharma retired hurt or out Debate:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात नुकतीच टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा सामना रोमांचक झाला. या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन सुपर ओव्हर झालेला हा पहिलाच सामना ठरला. या रोमांचक झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.

मात्र, याच सामन्यात रोहित शर्मा पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रिटायर्ड हर्ट झाला की रिटायर्ड आऊट याबाबात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याबाबत आता दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिविलियर्सनेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात निर्धारित 20 - 20 षटकांनंतर दोन्ही संघांच्या 212 - 212 धावा झाल्याने बरोबरी झाली होती. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 16 धावा करत भारताला 17 धावांचे लक्ष्य दिले.

Rohit Sharma - AB de Villiers
Retired Hurt or Out: रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊट, म्हणजे नक्की काय? जाणून घ्या दोन्ही प्रकाराचे नियम

यावेळी भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 5 चेंडूत 15 धावा केल्या होत्या. अखेरच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. यावेळी अचानक रोहित माघारी परतला. पण त्यावेळी तो रिटायर्ड आऊट झाल्याचे समजले गेले, मात्र पहिली सुपर ओव्हरही १६-१६ धावांनंतर बरोबरीत सुटल्यानंतर तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीला आला.

त्यामुळे चर्चांना सुरुवात झाली. कारण सुपर ओव्हरच्या नियमानुसार पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेले खेळाडू दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही.

या नियमानुसार जर तो रिटायर्ड आऊट असेल, तर तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला कसा येऊ शकतो, अशा चर्चेला सुरुवात झाली. यावर बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Rohit Sharma - AB de Villiers
IND vs AFG, Video: जर विराट नसता, तर कदाचीत सुपर ओव्हर झालीच नसती, पाहा किंग कोहलीची अफलातून फिल्डिंग

दरम्यान, याबद्दल आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना एबी डिविलियर्स म्हणाला, 'डबल सुपर ओव्हर, अविश्वसनीय. जर तुम्ही पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झाला असाल, तर तुम्ही पुन्हा फलंदाजी करू शकत नाही. मला वाटते भारतीय संघाने दावा केला असेल की तो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला किंवा कदाचीत धावफलक अपडेट करताना चूक झाली असेल की त्याला आऊट दाखवले.'

तथापि, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माने 11 धावा केल्या. त्यानंतर 12 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने एकच धाव करत पहिल्या तीन चेंडूतच दोन विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला.

याच सामन्यात खेळताना रोहितने 69 चेंडूत 121 धावांची नाबाद खेळी केली होती. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पाचवे शतक होते. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पाच शतके करणारा पहिलाच खेळाडू ठरला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com