India vs Pakistan: 'विराटने मॅचविनिंग शॉट खेळण्यासाठी मला दिलेले 7 पर्याय', अश्विनने ऐकवला T20 WC मधील किस्सा

टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध विनिंग शॉट खेळण्यासाठी विराटने 7 पर्याय दिल्याचा खुलासा आर अश्विनने केला आहे.
R Ashwin and Virat Kohli
R Ashwin and Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

R Ashwin Reveals Conversation win Virat Kohli during India vs Pakistan T20 World Cup 2022 Match:

भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामने नेहमीच चर्चेत असतात. असाच या दोन संघातील एक रोमांचक सामना म्हणजे 23 ऑक्टोबर 2022 रोजी टी20 वर्ल्डकपमध्ये झालेला सामना.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात भारताने अखेरच्या चेंडूवर 4 विकेट्सने विजय मिळवला होता. हा भारताच्या अविस्मरणीय विजयांपैकी एक ठरला होता. आता या सामन्यात विराट कोहलीने काय सल्ला दिला होता याबद्दल आर अश्विनने खुलासा केला आहे.

या सामन्यात अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी 1 धावेची गरज असताना अश्विन फलंदाजी करत होता, त्याच्याबरोबर अर्धशतक केलेला विराट नॉनस्ट्रायकरला होता. यावेळी अश्विनने एकेरी धाव काढली होती. ही भारतासाठी विजयी धाव ठरली होती.

दरम्यान, हा सामन्यातील अखेरचा, पण अश्विनचा पहिला चेंडू खेळताना विराटकडून काय सल्ला मिळाला होता, याबद्दल अश्विनने आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

R Ashwin and Virat Kohli
World Cup 2023: स्टेडियम ठरवताना राजकारण झालं? BCCI उपाध्यक्ष म्हणतायेत, 'मुद्दाम गोष्टी...'

अश्विनने सांगितले की 'जेव्हा मी पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या चेंडूवर फलंदाजी करण्यासाठी जात होतो मी दिनेश कार्तिकला शिव्या देत होत, त्याने मला कठीण काम करायला लावले होते.पण मला आत जाताना विशालता जाणवली, प्रेक्षक ओरडत होते, मी कधीही एवढे प्रेक्षक पाहिले नव्हते.'

त्यावेळी विराटने मला तो एक चेंडू खेळण्यासाठी 7 पर्याय दिले. जर मी तेवढे शॉट्स खेळण्यासाठी सक्षम असतो, तर मी आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली नसती. हा मी माझ्या मनात विचार केला, पण त्याला काही म्हणालो नाही. जेव्हा मी विराटच्या डोळ्यात पाहिले, तेव्हा तो पूर्ण झपाटलेला होता, तो वेगळ्याच ग्रहावरचा भासत होता, पण मी मलाच म्हणालो की मला पृथ्वीवर येऊ दे.
आर अश्विन

अश्विन पुढे म्हणाला, 'जेव्हा नवाजने वाईड टाकला, तेव्हा मला जाणवले की मी स्पर्धा जिंकली आहे. क्रिकेट तु्म्हाला वेगवेगळ्या प्रकारे संदेश देत असते. त्यातूनच मला सकारात्कता मिळते की मी सामना जिंकेल.

'जेव्हा मी रात्री झोपायला जातो तेव्हा मी विचार करतो की काय झाले, जेव्हा पण मी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहातो, तेव्हा विचार करतो की जर तो चेंडू पॅडला लागला असता, तर. पण मला नंतर चांगले वाटते.'

'कदाचीत तो सामना माझ्याकडूनच संपायचा होता. पण खरंच प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर विराटने शानदार खेळी केली होता. तो एक अविश्वसनीय सामन्यांपैकी एक होता आणि मी त्याचा भाग होतो.'

R Ashwin and Virat Kohli
World Cup Qualifiers 2023: वेस्ट इंडिज वर्ल्डकप 2023 मधून होणार बाहेर? माजी विश्वविजेत्यांसमोर असे आहे समीकरण

असा रंगलेला अखेरच्या क्षणांचा थरार

या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानने विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले होते. पण भारतीय संघाने फलंदाजी करताना संघर्ष केला होता. मात्र, असे असले तरी विराट कोहलीने भारताची एक बाजू चांगली सांभाळत अर्धशतक केले होते. त्याला हार्दिक पंड्याने 40 धावा करत चांगली साथ दिली होती. त्यामुळे भारतासाठी विजय दृष्टीक्षेपात होता.

मात्र, अखेरच्या दोन चेंडूवर भारताला 2 धावांची गरज असताना विराटबरोबर सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेला दिनेश कार्तिक अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. त्यामुळे सामन्याला रोमांचक वळण मिळाले होते.

अखेरच्या चेंडूवर भारताला 2 धावांची गरज होती. त्यावेळी 8 व्या क्रमांकावर उतरलेला आर अश्विन स्ट्राईकवर होता, तर अर्धशतकी खेळी केलेला विराट नॉन-स्ट्रायकर एन्डला होता. त्यामुळे अश्विनवर मोठा दबाव होता. पण नवाझने हा चेंडू वाईड टाकला आणि सामना बरोबरीत आला.

चेंडू वाईड गेल्याने नवाजला अखेरचा चेंडू पुन्हा टाकावा लागला. या चेंडूवर 1 धावेची गरज होती. यावेळी अश्विनने मिड-ऑफला शॉट खेळला, त्यामुळे त्याने आणि विराटने एक धाव पूर्ण केली आणि भारताला विजय मिळवून दिला होता.

या सामन्यात विराटने 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली होती. यात त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com