आजकाल धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे अनेक आजारांना लोक बळी पडतात. निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणे, योगा करणे आणि पोषक आहार घेणे गरजेचे असते. नियमितपणे सुर्यनमस्कार केल्याने अनेक अनेक आजार दूर राहतात. पण अनेक लोकांना कमरेतून वाकता नाही येत किंवा जमिनीवर झोपून करता येत नाही. अशा वेळी तुम्ही खुर्चीवर बसून सुर्य नमस्कार करू शकता. खुर्चीवर बसून सुर्यनमस्कार कसा करावा हे जाणून घेऊया.
सुर्यनमस्कार करताना सर्वात पहिले खुर्चीवर पाय एकत्र ठेवून बसावे. आता छातीसमोर हात दुमडून घ्या. पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवा. डोळे बंद करा आणि तीन दीर्घ श्वास घ्या.
नंतर एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, आपले हात खांद्यावर पसरवा. त्यांना वरच्या बाजूस ठेवताना तुम्ही तुमच्या हाताला ताण द्यावे.
यानंतर आता डोके वाकवताना श्वास सोडा आणि पुढे जा. आपल्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि आपले डोके गुडघ्यांच्या दरम्यान ठेवा. खाली पहा आणि काही सेकंदांसाठी अशा स्थितीत राहावे.
नंतर एक श्वास घ्या आणि खुर्चीवर सरळ बसण्यासाठी उठा. तुमचा उजवा पाय वर करा आणि गुडघा वाकवा. गुडघा छातीच्या जवळ आणा आणि दोन्ही हातांनी धरा. वरच्या दिशेने पहा आणि आपली मान पाठीमागे पसरवा. तुमचा डावा पाय जमिनीवर घट्ट ठेऊन पोझ धरा.
नंतर तुम्हाला फक्त तुमची मान पुढे करायची आहे. आपल्या कपाळाचा वापर करून गुडघ्याला स्पर्श करा आणि आपला पाय छातीच्या जवळ दाबा. खाली पहावे.
आता, तुमचा पाय जमिनीकडे परत आणा आणि तुमचा पाठीचा कणा सरळ करा. तुमचे पाय वर उचला आणि त्यांना जमिनीला समांतर ठेवा. चांगल्या संतुलनासाठी, खुर्चीच्या बाजूंना धरून ठेवा.
असे परत उलटे करत जावे.
खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि तुम्हाला फ्रेश वाटते.
पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करते.
आपले हात, पाय आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.
खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार केल्याने एकाग्रता वाढते.
वृद्ध व्यक्तींसाठी हा योग प्रकार उत्तम आहे. असे लोक सहज सुर्यनमस्कार करू शकतात.
दिवसातून एकदा किंवा दोनदा करू शकता.
सुर्यनमस्कार करताना हळूहळू करावे.
सुर्यनस्कार करण्यापुर्वी किंवा केल्यानंतर ३ तास काही खाऊ-पिऊ नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.