Yellow Tongue: जीभेचा बदललेला रंग देतो 'या' गंभीर आजारांचे संकेत

तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल तर डॉक्टर जेव्हा रूग्णांची तपासणी करतात तेव्हा पहिले ते जीभ तपासतात.
Yellow Tongue
Yellow TongueDainik Gomantak
Published on
Updated on

Yellow Tongue: बदलत्या हवामानाचा आणि आहाराचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आपल्या शरिराचा प्रत्येक भाग हा वेगवेगळे संकेत देत असतो. ज्यामुळे तो आजारी आहे असे समजते. तसेच जर तुमच्या रंग बदलला असेल तर अनेक गंभीर आजारांचे लक्षण असु शकते. अशावेळी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • जीभ पिवळी का होते

जीभ पिवळी होण्यामागे अनेक कारण असू शकतात.पिवळ्या रंगाचे पदार्थ खाल्यास, अशक्तपणा, लिव्हरचा त्रास,शरिरात पाण्याची पातळी कमी होणे यासारख्या कारणांमुळे जीभ पिवळी होऊ शकते. यावर योग्य उपचार केल्यास जिभेचा रंग पुन्हा सामान्य होऊ सकतो. पण थकवा, वजन कमी होणे, ताप यासारख्या कारणांमुळे जीभ पिवळी होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • जीभेचा रोज रंग तपासावा

जीभचा रंग लाइट गुलाबी असतो. रोज आरशात जीभ पाहावी. जर तुम्हाला जीभेचा रंग बदललेला दिसला तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.

Yellow Tongue
Shravan Special: श्रावणात जन्मलेल्या बाळाचं ठेवा 'हे' नाव...भोलेनाथाची होईल कृपा

जिभेचा बदलत्या रंगाचा अर्थ

  • तपकिरी जीभ

जे लोक चहा, कॉफी, सिगारेट, आणि हुक्काचे अधिक सेवन करतात त्यांची जीभ तपकिरी रंगाची होते.

  • काळी जीभ

जीभ काळी पडली असेल तर कर्करोग, फंगल इन्फेंक्शन आणि अल्सरची समस्या निर्माण होऊ शकते.

  • लाल जीभ

व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे देखी जीभेचा रंग लाल होतो.

  • निळी जीभ

हृदयाशी संबंधित आजार उद्भवल्यास जिभेचा रंग निळा किंवा फिकट जांभळा होतो.

  • पांढरी जीभ

जेव्हा तुम्ही तुमची जीभ अनेक दिवस स्वच्छ करत नाही तेव्हा त्यावर पांढऱ्या रंगाचा थर जमा होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com