Shravan Special: श्रावणात जन्मलेल्या बाळाचं ठेवा 'हे' नाव...भोलेनाथाची होईल कृपा

श्रावणात जर तुमच्या घरी बाळ जन्माला आले असेल तर तुम्ही शंकराच्या या नावांपैकी ठेवल्यास बाळांवर कायम महादेवाची कृपा राहिल असे सांगितले जाते.
Shravan Special
Shravan SpecialDainik Gomantak

unique baby boy or girl name inspired by lord shiva

श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यात शिवभक्त मनोभावे महादेवाची पुजा करतात. श्रावणात जर तुमच्या घरी बाळ जन्माला आले असेल तर तुम्ही शंकराच्या या नावांपैकी ठेवल्यास बाळांवर कायम महादेवाची कृपा राहिल असे सांगितले जाते.

  • श्रावणात जन्मलेल्या मुलांचे कोणते नाव ठेवावे?

अभिगम्य

या नावाचा अर्थ जो सर्वकाही सहजतेने साध्य करण्यास सक्षम आहे असा आहे.

अभय

अभय या नावाचा अर्थ ज्याने भीतीवर विजय मिळवला आहे असा होतो.

रुद्र

रूद्र हे नाव भगवान शिवाचे दुसरे नाव आहे. जेव्हा भगवान शंकराने रूद्र रूप धारण केले होते.

आशुतोष

आशुतोष या नावाचा अर्थ जो व्यक्ती नेहमी आनंदी आणि उत्साही राहतो.

मृत्युंजय

या नावाचा अर्थ जो शाश्वत आहे आणि मृत्यूवर विजय मिळवतो. यामुळे तुम्ही मुलाचे हे नाव ठेवल्यास महादेवाची कृपा कायम तुमच्यावर राहिल.

 Lord Shiva
Lord Shiva Dainik Gomantak
  • श्रावणात मुलगी झाल्यास कोणते नाव ठेवावे?

शैलजा

शैलजा म्हणजे डोंगरातून जन्माला आलेली मुलगी. या महिन्यात जन्मलेल्या मुलीचे नाव शैलजा ठेवल्यास माता पार्वतीचा आशीर्वाद नेहमी राहिल.

शिवांगी

या नावाचा अर्थ भगवान शिवाच्या शरीराचा अर्धा भाग होय. हे नाव ठेवल्यास भोलेनाथाची कृपा कायम राहिल.

Shravan Special
Vastu Tips For Shravan Month: श्रावण महिन्यासाठी खास वास्तू टिप्स; 'या' 6 गोष्टी केल्यास भोलेनाथ होतील प्रसन्न

शिवांशिका

भगवान शिवाचा भाग असा या नावाचा अर्थ होतो.हे नाव ठेवल्यास महादेवाची बाळावर कायम कृपा राहते.

शिवाली

भगवान शिवाची भक्त असा या नावाचा अर्थ होतो. जर तुम्ही मुलीचे नाव ठेवले तर शिवाचा आशीर्वाद राहतो.

शिवाशिनी

हे नाव भगवान शिवाच्या पत्नीचे नाव असून तुम्ही मुलीचे हे नाव ठेवल्यास महादेवाचा आशीर्वाद कायम राहतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com