World Hemophilia Day 2023: जागतिक हिमोफिलिया दिवस दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाचे संस्थापक फ्रँक श्नबेल यांचा जन्म 17एप्रिल रोजी झाला.
म्हणूनच हा दिवस हिमोफिलिया आणि संबंधित रक्तस्त्राव विकारांबद्दल जागरुकतेसाठी साजरा केला जातो.
हिमोफिलिया म्हणजे काय?
हिमोफिलियामध्ये रक्त गोठण्याची क्षमता गंभीरपणे कमी होते. यामुळे हिमोफिलियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला किरकोळ जखमा होऊनही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होतो.
हिमोफिलिया हा रोग सामान्यतः जनुकातील उत्परिवर्तन किंवा बदलामुळे होतो. ज्यामध्ये 'रक्ताची गुठळी' बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लॉटिंग फॅक्टर प्रथिने तयार करण्याच्या सूचना दिल्या जातात.
जनुकातील अशा प्रकारचा बदल किंवा उत्परिवर्तनामुळे गोठलेल्या प्रथिनांना योग्य प्रकारे कार्य करण्यापासून रोखता येते. ही जनुके X गुणसूत्रावर असतात. महिलांपेक्षा (Women) पुरुषांना हिमोफिलिया आजार होण्याची अधिक शक्यता असते.
यामागील कारण म्हणजे मुलाचे लिंग ज्या पद्धतीने ठरवले जाते. त्यामध्ये आनुवंशिकता गुंतलेली असते. जरी हिमोफिलिया रोग हा अत्यंत दुर्मिळ प्रकारचा आजार आहे. 10,000 लोकांपैकी सुमारे 1 व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे.
हिमोफिलियाची कारणे
आनुवंशिकता
कर्करोग
मल्टीपल स्क्लेरोसिस
गर्भधारणा
औषधांची रिऍक्शन
हिमोफिलियावर उपचार
हिमोफिलियावर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अनुपस्थित क्लोटिंग घटक बदलणे होय. या पद्धतीच्या मदतीने रक्त गोठण्याची प्रक्रिया सामान्य करण्यास मदत होते.
या प्रक्रियेअंतर्गत इंजेक्शनद्वारे कृत्रिमरित्या तयार केलेले क्लॉटिंग घटक रुग्णाच्या नसांमध्ये सोडले जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.