Harmful Effects Of Using Lipsticks
Harmful Effects Of Using LipsticksDainik Gomantak

Harmful Effects Of Using Lipsticks: सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक लावताय? मग 'ही' घ्या काळजी

सुंदर दिसण्यासाठी तुम्हीही लिपस्टिक लावत असाल तर ही काळजी घेणे गरजेचे आहे.
Published on

Harmful Effects Of Using Lipsticks: लिपस्टिक लावणे हा प्रत्येक महिलांचा आवडता छंद आहे. लिपस्टिक हा मेकअपचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही मुलीचा किंवा महिलेचा मेकअप किट वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिकशिवाय अपूर्ण असतो.

कारण लिपस्टिक लावल्याने ओठांचे सौंदर्य वाढते. अनेक महिलांमध्ये (Women) लिपस्टिक लावल्याने आत्मविश्वास वाढतो. इतकंच नाही तर लिपस्टिक तुमच्या व्यक्तिमत्त्वात ग्लॅमर आणण्याचे काम करते. पण तुम्हाला माहिती आहे का की लिपस्टिक लावल्याने ओठांवर अनेक दुष्परिणाम होतात. 

तुम्ही जी लिपस्टिक लावत आहात ती शिसे, क्रोमियम सारख्या विविध प्रकारच्या रसायनांनी बनलेली आहे. हे फक्त तुमच्या ओठांच्या नैसर्गिक चमक आणि सौंदर्यावर परिणाम करत नाही तर तुमच्या आरोग्यासाठी (Health) देखील खूप हानिकारक आहे. 

अनेक वेळा महिला लिपस्टिक लावून काहीतरी खातात किंवा पितात, त्यासोबत त्या लिपस्टिकचे काही भाग देखील पाटात जातो. त्यामुळे लिपस्टिक लावल्याने काय नुकसान होऊ शकते हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. 

  • लिपस्टिक लावण्याचे तोटे

लिपस्टिकमध्ये असलेल्या हानिकारक रसायनांमुळे, ऍलर्जी, चिडचिड आणि ओठ तसेच आसपासच्या त्वचेला (Skin) मुंग्या येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय अनेक घातक रसायने आणि धातू अशा असतात की कर्करोगाचा धोका असतो. लिपस्टिक लावण्याचे तोटे जाणून कोणते आहेत हे जाणून घेऊया.

  • पोटात ट्यूमर आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका

  • मेंदूच्या विकासावर वाईट परिणाम

  • लिपस्टिकमुळे कर्करोगाचा धोका 

  • शिसे मज्जासंस्थेसाठी हानिकारक

  • शरीरात टॉक्सिन्स जमा होण्याचे प्रमाण वाढते

  • त्वचेची छिद्रे बंद होतात 

Harmful Effects Of Using Lipsticks
Improve Attention Span: तुमचेही लक्ष केंद्रित होत नसेल तर 'या' टिप्सचा करा वापर
  • लिपस्टिकमुळे होणारी हानी कशी टाळायची? 

1. लिपस्टिक लावण्यापूर्वी पेट्रोलियम जेली ओठांवर लावावे. यामुळे लिपस्टिकचे हानिकारक प्रभाव कमी होऊ शकतात.

2. लिपस्टिक हे मेकअप प्रोडक्ट आहे. ते फक्त खास कार्यक्रमांसाठीच लावावी. रोज वापरणे टाळा. 

3. फक्त हलक्या शेडची लिपस्टिक वापरावी. 

4. लिपस्टिक खरेदी करताना त्यातील घटक वाचावे. 

5. रात्री झोपण्यापूर्वी लिपस्टिक काढून झोपावे. 

  • लिपस्टिक लावण्याचे फायदे

1. लिपस्टिक लावल्याने चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून येते.  

2. लिपस्टिकमध्ये असलेले SPF सूर्याच्या किरणांपासून ओठांवर संरक्षणात्मक थर तयार करण्याचे काम करते. 

3. लिपस्टिक तुमचे स्मित तेजस्वी आणि सुंदर बनवते. 

4. लिपस्टिक लावल्याने महिलांना आत्मविश्वास अधिक वाढतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com