Improve Attention Span: तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे आणि अधिक आरामदायक केले आहे. पण याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. आपल्याला कदाचित माहिती नसेल, परंतु स्मार्टफोन, टॅब्लेट, कॅम्पुटर आणि टीव्हीसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा आपल्या आरोग्यावर खूप विपरित परिणाम होत आहे.
अभ्यासानुसार, सर्व वयोगटातील लोकांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झालेली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सचा सततचा वापर आणि त्यामुळे लक्ष केंद्रित न करण्याची समस्या वाढत आहे. जर तुम्हालाही असी समस्या असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
सोशल मीडियापासून दूर रहावे
तज्ञांच्या मते जेव्हा तुम्ही तासंतास सोशल मिडिया (Social Media) वापरता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मेंदुवर होतो. यामुळे तुम्ही कोणत्याही लक्ष केंद्रित करु शकत नाही. यामुळे झोपतांना मोबाईलवर सोशल मडियाचा वापर करणे टाळावे.
मेडिटेशन करावे
जर तुम्हाला तुमची कामावर लक्ष केंद्रित (Focus) करण्याची क्षमता टिकून ठेवायची असेल तर मेडिटेशन करणे खुप चांगले आहे. मेडिटेशन केल्याने मेंदु (Brain) आणि मन दोन्ही शांत होऊन आपण कामावर लक्ष देऊ शकतो.
ब्रेक घ्यावा
कामातुन योग्य वेळी ब्रेक घ्यावा. यामुळे तुम्ही फ्रेश होऊन पुन्हा कामावर फोकस करु शकता. तज्ञांच्या मते कामातुन वेळ काढून तुमच्या आवडीचे काम करावे. यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवता येईल.
निसर्गाच्या सानिध्यात राहावे
लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवाची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. तज्ञांच्या मते 20 मिनिटं निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास तुम्हाला मानसिक शांतात (Mental Health) मिळेल. यामुळे तुम्हाला लक्ष देऊन काम करता येईल.
बाहेर चालायला जावे
तज्ञांच्या मते बाहेर चालायला (Walking) जाणे देखील लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.किमान १५ मिनिटं जरी तुम्ही चालालात तर तुम्ही फ्रेश वाटेल .
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.