Women Care: प्रेग्नन्सीमध्ये डक वॉक ठरतो फायदेशीर, जाणून घ्या फायदे

Health Tips for Pregnant Women: प्रेग्नन्सी दरम्यान महिलांनी आहारासोबत व्यायम करणे देखील गरजेचे असते.
Pregnant Women
Pregnant Women Dainik Gomantak

Health Tips for Pregnant Women: प्रेग्नन्सीमध्ये आई आणि बाळ निरोगी राहणे पार गरजेचे असते. यासाठी पोषक आहारसोबतच व्यायम करणे देखील आवश्यक असते. तज्ञांच्या मते गर्भवती महिलांनी डक वॉकचा सराव करावा.

हा व्यायाम केल्याने गर्भवती महिलांना डिलीव्हरीच्या वेळी समस्या येत नाही. ऑनली माय हेल्दमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार गर्भवती महिलांनी या काळात डक वॉक करावा. याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.

  • गर्भवती महिलांसाठी 'डक वॉक'का गरजेचा ?

'डक वॉक' हा एक विशिष्ट प्रकारचा स्क्वॅटिंग व्यायाम आहे. यामध्ये एखादी व्यक्ती बदकासारखा चालतो. या व्यायामामध्ये पाय जमिनीवर सपाट आणि पाठ सरळ ठेवत चालावे लागते.

'अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट'च्या मते, गरोदरपणात लवचिकता राहण्यासाठी हा वॉक करणे फायदेशीर ठरते.

गर्भवती महिलांनी व्यायाम करणे आणि फिटनेसची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यासोबतच गरोदरपणात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवावे लागते.

गर्भवती महिलांनी स्वतःला शक्य तितके अॅक्टिव ठेवणे खूप महत्वाचे आहे. यामुळे मधुमेह, प्रीक्लेम्पसिया आणि सिझेरियन सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

Pregnant Women
बॉडी मसाज करण्याचे चमत्कारी फायदे...! जाणून घ्या मसाजची योग्य वेळ
  • 'डक वॉक'चे फायदे कोणते?

डक वॉकमुळे पेल्विक फ्लोअरचे स्नायू सक्रिय होतात. जे गर्भधारणेदरम्यान गर्भाशय आणि पेल्विक अवयवांना आधार देण्यामध्ये विशेष भूमिका बजावते. या स्नायूंना मजबुत करून तुम्ही कधीही हालचाल करू शकता.

त्यामुळे गर्भधारणाही चांगली होते. गर्भधारणेमुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि लवचिकता कमी होऊ शकते. डक वॉकमुळे शरीरात लवचिकपणा टिकून राहतो.

खास करून डिलिव्हरी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात. गर्भधारणेदरम्यान हा व्यायाम शरीराला लवचिक बनवतो. ज्यामुळे तुम्हाला डिलिव्हरी दरम्यान वेदना सहन करता येतात आणि नॉर्मल डिलिव्हरी शक्य होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com