बॉडी मसाज करण्याचे चमत्कारी फायदे...! जाणून घ्या मसाजची योग्य वेळ

Benefits of Body Massage: बॉडी मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
Body Massage
Body MassageDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits of Body Massage: आजच्या धावपळीच्या जीवनात बॉडी मसाज आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो. तुमच्या लाइफस्टाइलमधला तणाव कमी करण्यात मदत करू शकते.

बॉडी मसाजमुळे तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो, रक्तदाब नियंत्रणार राहतो आणि डोकेदुखी,स्नायू दुखणे कमी होते. चला तर मग बॉडी मसाजचे चमत्कारी फायदे कोणते आणि योग्य वेळ कोणती आहे जाणून घेऊया.

  • मानसिक आरोग्य

    बॉडी मसाजमुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत मिळू शकते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. तसेच झोप चांगली येते आणि मानसिक आरोग्य सुधारते. 

  • स्नायूवरचा ताण कमी
    बॉडी मसाजमुळे स्नायूंवरचा ताण कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो. हे ताण कमी करण्यास आणि शारीराला लवचिक बनवण्यास मदत करते. 

  • चिंता कमी करते
    बॉडी मसाजमुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. हे शरीरातील थकवा दूर होतो. ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.

  • शारीरिक लवचिकता

    बॉडी मसाज योग्य प्रकारे केल्याने स्नायूं मोकळे होतात. ज्यामुळे शारीरिक आरोग्य सुधारते. हे शरीराच्या लवचिक आणि तंदुरुस्त बनवते.

Body Massage
5 Healthy Drinks: स्वत:ला एनर्जेटिक ठेवायचे असेल तर सकाळी 'या' 5 पेयांचे करा सेवन
  • रक्ताभिसरण चांगले होते
    बॉडी मसाज केल्याने शरिरारतील रक्ताभिसरण सुरळित कार्य करते. ज्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते. कोणतेही आजार जवळ येत नाही.  

  • आरोग्य सुधारण्यास मदत
    बॉडी मसाज केल्याने तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. स्नायूंमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यासारख्या विविध शारीरिक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. नियमित बॉडी मसाज केल्याने तुमचे शारीरिक आरोग्य चांगले राहते आणि विविध शारीरिक समस्या दूर राहतात.  

  • बॉडी मसाज कधी करावा?
    काही लोकांना सकाळी बॉडी मसाज करायला आवडते तर काही लोकांना रात्री बॉडी मसाज करायला आवडते. पण रात्री बॉडी मसाज केल्याने अधिक आरामदायी वाटते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार वेळ निवडू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com